मंचरमध्ये भाविकांना आठ दिवस मिळणार विचारांची शिदोरी

डी. के. वळसे पाटील
बुधवार, 2 मे 2018

मंचर (पुणे) : "संत तुकाराम महाराज यांनी मंचर येथे मुक्कामी थांबून मंचरी ग्रंथ लिहिला. या भूमीमध्ये खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या 62 व्या वाढदिवसानिमित्त कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे. भाविकांना आठ दिवस विचारांची शिदोरी मिळणार आहे. हा उपक्रम कौतूकास्पद आहे", असे धर्माचार्य अँड. शंकर महाराज शेवाळे यांनी सांगितले.

मंचर (पुणे) : "संत तुकाराम महाराज यांनी मंचर येथे मुक्कामी थांबून मंचरी ग्रंथ लिहिला. या भूमीमध्ये खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या 62 व्या वाढदिवसानिमित्त कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे. भाविकांना आठ दिवस विचारांची शिदोरी मिळणार आहे. हा उपक्रम कौतूकास्पद आहे", असे धर्माचार्य अँड. शंकर महाराज शेवाळे यांनी सांगितले.

मंचर (ता. आंबेगाव) येथे कीर्तन महोत्सवाचे उद्घाटन प्रसंगी शेवाळे महाराज बोलत होते. यावेळी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, कल्पना आढळराव पाटील कीर्तन महोत्सवाचे निमंत्रक सरपंच दत्ता गांजाळे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सुरेश भोर, शिवसेना तालुका प्रमुख सुनील बाणखेले, सुभाष थोरात, संदीप नाना गांजाळे, अरुण नाना बाणखेले, रंगनाथ थोरात, दिनेश मोरडे उपस्थित होते. दूरवरच्या भागातून भाविक येथे आले होते.

मंचरी गाथेची शहरातून मिरवणूक काढण्यात आली. अग्रभागी वारकरी संप्रदायाचे भजनी मंडळ होते. मिरवणुकीचे नागरिकांनी उस्फुतपणे स्वागत केले. शिवाजी चौकात शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाच्या ठिकाणी मंचरी गाथा ग्रंथ व विठ्ठल मूर्तीचे पूजन पांडुरंग महाराज येवले व कांता नाना बाणखेले यांनी केले.

संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील विविध प्रसंग शेवाळे महाराज यांनी सांगितले. सिंहगड (कोंढाणा) किल्यावरील लढाईचा प्रसंग सांगत असताना तानाजी मालुसरे यांच्या कामगिरीचे चित्तथरारक वर्णन ऐकताना उपस्थितांची मने हेलावली. शेवाळे महाराज म्हणाले, "आढळराव पाटील यांनी समाजासाठी अहोरात्र काम केले आहे. समाजाला दिशा देण्यासाठी व तरुण पिढीवर योग्य संस्कार होण्यासाठी कीर्तन महोस्त्व उपयुक्त ठरणार आहे. राज्यातील नामवंत कीर्तनकारांचा महोत्सवात सहभाग हे. भाविकांनी लाभ घ्यावा."

उपस्थित असलेल्या भाविकातून पाच महिला व पाच पुरुषांची नावे सोडत पद्धतीने दररोज काढली जाणार आहेत. शिवाजीराव आढळराव पाटील व कल्पना आढळराव पाटील यांच्या हस्ते 10 नावे काढण्यात आली. सदर भाविकांसाठी मोफत काशी यात्रेचे आयोजन केले जाणार आहे. सूत्रसंचालन संतोष महाराज बढे व रोहिदास महाराज भोर यांनी केले.

Web Title: kirtan mahotsav in manchar