फिर्याद मागे घेत नसल्याने पत्नीवर चाकूने वार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

पुणे - फिर्याद मागे घेण्यास विरोध केल्याने पतीने पत्नीवर चाकूने वार केल्याची घटना शुक्रवार पेठेत घडली. रूपाली संतोष भोसले (वय 28, रा. आंबेगाव पठार, कात्रज) असे जखमी महिलेचे नाव आहे. पत्नीच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पती संतोष महादेव भोसले (वय 31, रा. शुक्रवार पेठ, वनराज मंडळाजवळ) यास अटक करण्यात आली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रूपाली व संतोष दोन ते अडीच वर्षांपासून विभक्‍त राहतात. रूपालीने संतोष व त्याच्या बहिणीविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचार व मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. तिने फिर्याद मागे घ्यावी, अशी मागणी संतोष सातत्याने करत होता. 

दोघांच्याही नावावर एक सदनिका असून, सदनिकेच्या कर्जाचा हफ्ता न दिल्यामुळे बॅंकेने त्यांना नोटीस बजावली होती. या संदर्भातच बोलण्यासाठी संतोषने रूपालीला सदनिका असलेल्या इमारतीच्या पार्किंगमध्ये बोलाविले. तिथे पुन्हा फिर्याद मागे घेण्यास सांगितले. त्यास रूपालीने नकार दिल्यामुळे चिडलेल्या संतोषने तिच्यावर चाकूने वार केले.

Web Title: knife attack on wife in pune