पुणेकरांनो, ट्रॅफिकमध्ये अडकू नका; 'ही' आहे वाहतुकीची सद्यस्थिती

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

पुणे : काही दिवसांच्या विश्रांतीनंतर शहरासह उपनगरांत पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. आज (शनिवारी) सकाळपासूनच जोरदार पाऊस पडत आहे. परिणामी शहरातील वाहतुकीचा वेग मंदावला. त्यामुळे पुणेकरांनो, कोठेही जाण्याआधी वाहतुकीच्या सद्य परिस्थिती जाणून घ्या. टॅफिक मध्ये अडकू नका आणि सोबत छत्री आणि रेनकोट ठेवायला विसरू नका.​

पुणे : काही दिवसांच्या विश्रांतीनंतर शहरासह उपनगरांत पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. आज (शनिवारी) सकाळपासूनच जोरदार पाऊस पडत आहे. परिणामी शहरातील वाहतुकीचा वेग मंदावला. त्यामुळे पुणेकरांनो, कोठेही जाण्याआधी वाहतुकीच्या सद्य परिस्थिती जाणून घ्या. टॅफिक मध्ये अडकू नका आणि सोबत छत्री आणि रेनकोट ठेवायला विसरू नका.

हडपसर परिसरात पावसाची रिमझिम सुरु होती त्यामुळे मगरपट्टा ते पुलगेट परिसरतील वाहतूक संथ गतीने सुरू असून वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. पावसामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे.traffic at magarpatta

खडकवासला,किरकटवाडी, नांदेड, शिवणे, उत्तमनगर, कोंढवे धावडे परिसरात पहाटे पासून पावसाची रिमझिम सुरू होती. मागील तासभर झाला पाऊस कमी झाला आहे. 

टिळक रस्त्यावर स. प. महाविद्यालय ते साहित्य परिषद वाहतूक संथ गतीने सुरु आहे.

सिंहगड रस्ता परिसरात सकाळपासून पाऊस सुरू आहे. आनंदनगर, विठ्ठलवाडी, दत्तवाडी, दांडेकर पुल, वाहतूक  संथ गतीने सुरु असून बाकी वाहतूक सुरळीत सुरु आहे. 

शास्त्री रस्त्यावर नवी पेठ ते अलका चौकपर्यंत वाहतूक सथ गतीने सुरु आहे. लकडी पुल येथेही वाहतुकीचा वेग मंदवला आहे.

कोथरूडमध्ये पावसाची भुर भुर  सुरु आहे. पौड रस्ता, भुसारी कॉलनी, भारती नगर, कोथरुड पोलिस ठाणे, गुजरात कॉलनी या भागात वाहतूक संथ गतीने सुरु असून   बाकी वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे.

गणेशखिंड येथे पाषाण रस्ता, बाणेर रस्ता  औंध रस्ता येथील वाहतुकीचा वेग मंदावला आहे. रेंजहिल परिसरातही वाहतूक संथ गतीने सुरु आहे.

शिवाजीनगर भागातही वाहतूक संथ गतीने सुरु आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: know the current state of traffic in pune