इलेक्ट्रिक बसच्या चार्जिंगसाठी डिझेलचे इंजिन; जाणून घ्या काय आहे सत्य?

know the truth about Viral Video of Diesel engine used for Charging Pmpml electric bus
know the truth about Viral Video of Diesel engine used for Charging Pmpml electric bus

पुणे : इंधन बचत आणि प्रदुषणाला टाळण्यासाठी म्हणून पुण्यात इलेक्ट्रीक बस सेवा सुरु करण्यात आली. मात्र, या ई-बसचा एक व्हिडिओ सोशल मिडायावर व्हायरल झाल्याने पुणेकरांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली आहे. या व्हिडिओत पीएमपीएलच्या ई-बसची बॅटरी चार्जिंग करण्यासाठी डिझेलवर चालणाऱ्या जनरेटरचा वापर केला जात आहे. त्यामुळे पीएमपीएल आणि महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभारले आहे

या व्हायरल व्हिडिओत दिसणाऱ्या ई-बसवर पीएमपीएल, स्मार्ट सीटी, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आणि पुणे महापालिकेचा लोगो लावलेले आहेत. त्यावरुन ई-बसवर पीएमपीएलचीच ईबस असल्याचे स्पष्ट होते. हा व्हिडिओ दोन दिवसांपासून सोशल मिडियावर व्हायरल होत असून पुणेकरांनी याबाबत रोष व्यक्त केला आहे

दरम्यान, या व्हायरल व्हिडिओबाबत पीएमपीएलचे संचालक सिध्दार्थ शिरोळे यांनी ट्विट करुन खुलासा केला. ते म्हणाले आहेत की, ''पीएमपीएल ई-बसेस हैद्राबादमध्ये तयार केल्या असून तपासणीनंतर पुण्यात आणल्या आहेत. काही दिवसांपुर्वी 20 बसेस हैद्राबादवरुन पुण्यात आणण्यात आल्या. हा व्हिडिओ सोलापुरजवळील मार्गावरील आहे. साधारणत: ई-बस 250 किमी प्रवास करतात. सोलापुरमध्ये कोणतेही चार्जिंग स्टेशन नाही. कंपनींने दुसऱ्या टप्प्यासाठी बस चार्जिंग करण्यासाठी ही व्यवस्था केली होती. प्रत्येक ई-बस ईलेक्ट्रीक चार्जर वापरुनचं चार्ज केली जाते. जनरेटरचा वापर केला जात नाही.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com