अस्थिर मनाला शांत करण्याकरीता ज्ञान योग महत्वाचा - स्वामी प्रणवानंद

मिलिंद संधान
गुरुवार, 21 जून 2018

नवी सांगवी(पुणे) - "मन अस्थिर होत असताना सद्द परिस्थितीचा आहे तसा स्विकार करण्याचे ज्ञान सुत्र आपण आत्मसात केल्यास समाजातील विक्षिप्त लोकांच्या वागण्याने आपले मन त्रस्त होणार नाही. त्याकरीता ज्ञान योगाचे सुत्र आपण आत्मसात केले पाहिजे, कारण त्यामुळे अस्थिर मन शांत होते. " असे उद्गार आर्ट ऑफ लिव्हिंगचे स्वामी प्रणवानंद यांनी पिंपळे सौदागर काढले. आर्ट ऑफ लिव्हिंग व नगरसेवक शत्रुघ्न काटे युथ फाऊंडेशन यांच्या वतीने जागतिक योग दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या कार्यक्रम प्रसंगी त्यांनी आपले विचार मांडले.

नवी सांगवी(पुणे) - "मन अस्थिर होत असताना सद्द परिस्थितीचा आहे तसा स्विकार करण्याचे ज्ञान सुत्र आपण आत्मसात केल्यास समाजातील विक्षिप्त लोकांच्या वागण्याने आपले मन त्रस्त होणार नाही. त्याकरीता ज्ञान योगाचे सुत्र आपण आत्मसात केले पाहिजे, कारण त्यामुळे अस्थिर मन शांत होते. " असे उद्गार आर्ट ऑफ लिव्हिंगचे स्वामी प्रणवानंद यांनी पिंपळे सौदागर काढले. आर्ट ऑफ लिव्हिंग व नगरसेवक शत्रुघ्न काटे युथ फाऊंडेशन यांच्या वतीने जागतिक योग दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या कार्यक्रम प्रसंगी त्यांनी आपले विचार मांडले. यावेळी नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका निर्मला कुटे, कुंदा भिसे, जयनाथ काटे, संदिप नखाते यांच्यासह सौदागर परिसरातील नवचैतन्य हास्य क्लबचे नागरिक व अण्णासाहेब मगर विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. 

आज सकाळी बीआरटी रस्त्यावर शिस्तित जेष्ठांसह युवक युवतींनी योगासनांचे विविध प्रकार सादर केले. आर्ट ऑफ लिव्हिंगचे सत्यजीत भैया यांनी उत्तेजीत व्यायाम प्रकार ते उभे, बैठे व झोपून करावयाचे योगासनांचे प्रात्यक्षिके उपस्थितांकडून करून घेतले. दरम्यानच्या काळात पाऊसाचा थोडा शिडकावा झाला असला तरी लोकांच्या उत्साहात थोडीही कमी आली नाही. याउलट मोठ्या हर्षाने योग दिवस साजरा केला.

स्वामी प्रणवानंद म्हणाले, "संत मिराबाईंचा भक्ती योग, स्वामी विवेकानंदांचा कर्म योग जसा महत्वाचा तसा ज्ञान योगालाही अनन्य साधारण महत्व आहे. मनुष्याने आपला साठ टक्के वेळ ध्यानधारणेत, वीस टक्के सेवेत तर उरलेला वेळ ज्ञान साधनेत खर्च केला पाहिजे. त्यामुळे मनुष्य परिपुर्ण जीवन व्यतीत करून स्वतःची उन्नती करून घेईल.
 
योगासने झाल्यावर प्राणायाम आणि ध्यानधारनेने कार्यक्रमाचा समारोप झाला. निलेश कुंजीर, सागर बिरारी यांनी सुत्रसंचलन केले तर आरती आठले यांनी कार्यक्रम यशस्वी केला.

Web Title: Knowledge Yoga is important to calm the unstable mind - Swami Pranavananda