कोजागिरी पौर्णिमेनिमित्त कुसुरला धार्मिक व जुन्नरला सामाजिक कार्यक्रम

दत्ता म्हसकर 
बुधवार, 24 ऑक्टोबर 2018

जुन्नर - कुसुर - समर्थनगर ता.जुन्नर येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात कोजागिरी निमित मंगळवारी ता. 23 रात्री सामुदायिक श्री कुबेर, लक्ष्मी, इंद्र, चंद्र पूजन करण्यात आले. यानंतर दुग्ध प्रसादाचे वाटप व शेजारतीने दिवसभरच्या विविध धार्मिक कार्यक्रमांची सांगता झाली.

जुन्नर - कुसुर - समर्थनगर ता.जुन्नर येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात कोजागिरी निमित मंगळवारी ता. 23 रात्री सामुदायिक श्री कुबेर, लक्ष्मी, इंद्र, चंद्र पूजन करण्यात आले. यानंतर दुग्ध प्रसादाचे वाटप व शेजारतीने दिवसभरच्या विविध धार्मिक कार्यक्रमांची सांगता झाली.

यानिमित्ताने मंदिरात फुलांची आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सकाळी भूपाळी व श्रीच्या मूर्तींना महाभिषेक करण्यात आला. श्री कुबेर लक्ष्मी व दत्तस्वामी गायत्री यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. महिलांनी सामुदायिक दुर्गासप्तशती पाठाचे वाचन केले.दुपारी बल्लाळवाडी येथील भजनी मंडळाने भजने सादर केली. तुकाराम महाराज दुराफे व दत्तात्रेय पांडे यांनी पौरोहित्य केले. जुन्नर तालुका श्री स्वामी समर्थ सेवेकरींच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.दिवसभर दर्शनासाठी गर्दी होती. जुन्नरला शिवराय मंडळाचा सामाजिक उपक्रम येथील शिवराय मित्र मंडळच्या वतीने कोजागिरी निमित्त सामाजिक कार्यक्रम व रास दांडियाचे आयोजन केले होते. 

शिवजन्मभूमीत शि़वश्री निलेश कोरडे यांचे शिवव्याख्यान झाले. यावेळी त्यांनी उपस्थित युवा पिढीला व माता-भगिनींना मार्गदर्शन केले.  महिलांसाठी लकी ड्रॉ व विविध मनोरंजन खेळ ठेवण्यात आले होते. विजयी स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. जेष्ठ महिलांचा सत्कार करण्यात आला. विविध मनोरंजनाचे खेळ, दांडिया व अल्पोहाराने कार्यक्रमाची सांगता झाली. 

कार्यक्रमाचे नियोजन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मंदार बुट्टे पाटील व सहकाऱ्यांनी केले. गेल्या चार वर्षांपासून मंडळ मराठमोळी संस्कृती जपण्याचे काम करीत आहे. या कार्यक्रमाला युवक, युवतीं, महिलांचा प्रतिसाद मिळाला.

Web Title: kojagiri program in junnar