कोमलच्या शिक्षणासाठी दानशूर सरसावले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जुलै 2018

टाकवे बुद्रुक - कशाळच्या कोमल जाधवने दहावी उत्तीर्ण होऊन अकरावी वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला आहे. तिचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी दानशूरांनी मदतीचा हात तिच्यापाठीशी तसाच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यामुळे कधीकाळी शिक्षणाच्या प्रवासातून बाहेर पडते की काय, अशी भीती वाटणारी ही चारही भावंडे सकाळच्या पुढाकाराने आणि दानशूरांच्या मदतीने ही शिकत आहे. 

कोमल अकरावीत, श्रुती नववीत, प्रतिक्षा आठवीत, पार्थ सहावीत शिकत आहे. कशाळच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या लेकरांच्या आईचे छत्र मुले लहान असताना हरपले आहे. पत्नी वियोगात पतीने म्हणजे  कोमलच्या वडीलांनी मुलांकडे दूर्लक्ष केले. चुलता ,चुलती आणि आजी लेकरांचा संभाळ करीत आहेत. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने मुलांच्या शिक्षणाची समस्या निर्माण झाली होती. या भावंडांना 'शिक्षणासाठी मदतीची अपेक्षा 'या मथळ्याखाली सकाळने चार वर्षापूर्वी आवाहन करणारी  बातमी प्रसिद्ध केली होती. तेव्हा पासून प्रत्येक वर्षी दानशूर मंडळी शैक्षणिक वर्षाच्या सुरूवातीला भावंडांना शैक्षणिक साहित्य, गणवेश व आर्थिक मदत करीत आहे. 

कोमलचे अकरावी व बारावी या दोन वर्षाचे शैक्षणिक पालकत्व आंदर मावळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रूपेश घोजगे यांनी स्विकारले आहे. तर भोयरेच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजने शैक्षणिक शुल्क माफ केले आहे. यासाठी सरपंच बळीराम भोईरकर यांचे सहकार्य लाभले. लायन्स क्लब वडगावचे भूषण मुथा, इन्फोसिसच्या शीतल अखांडेकर, पिंपरीतील गृहिणी सुनंदा निकरड यांनी कोमलच्या बहीणी श्रुती, प्रतिक्षा आणि भाऊ पार्थ यांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात दिला आहे. वयोवृद्ध आजी शेतात राबवून चिमुकल्यांना दोन घास भरवते, त्यात दानशूरांच्या मदतीच्या पांघरूणा खाली लेकरे वाढत आहेत. शिकत आहेत.

या भावंडांना मदतीचा हात मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने दोन वर्षांपूर्वी वीस हजाराचे फिक्स डिपॉझिट करून केला आहे. याही रक्कमेची गरज भविष्यात लागणारच आहे. 

Web Title: komal getting education with the help of donation