Vidhan Sabha 2019 : पदाधिकारी राष्ट्रवादीची; प्रचार भाजप आमदाराचा, झाली बडतर्फ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

भाजपचे पुण्यातील वडगांव शेरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार जगदिश मुळीक यांच्या प्रचारात सहभागी झाल्याबद्दल कोमल चंद्रकांत टिंगरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे.

पुणे : भाजपचे पुण्यातील वडगांव शेरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार जगदिश मुळीक यांच्या प्रचारात सहभागी झाल्याबद्दल कोमल चंद्रकांत टिंगरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे.

राष्ट्रवादीच्या नगरसेविका रेखा चंद्रकांत टिंगरे यांची कोमल ही मुलगी आहे. तसेच, कोमल टिंगरे या नुकत्याच राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या पुणे शहर सचिवपदीही नियुक्ती करण्यात आली होती. 

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी पत्रक काढून ही निलंबनाची कारवाई केली आहे. त्यांनी काढलेल्या पत्रकात कोमल टिंगरे यांनी जाहीर पक्षाच्या विरोधात काम केले असल्याचे म्हटले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Komal Tingray has been suspended from the NCP