कोंढवे- धावडे सोसायटीत ते बिबट्या की, रानमांजर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Leopard or Wild Cat

कोंढवे- धावडे येथील श्रीकृष्णनगरी सोसायटीच्या प्रवेशद्वारातून बिबट्या सदृश्य प्राणी सोसायटीत आला आणि दुसऱ्या बाजूला तो गेला.

Leopard or Wild Cat : कोंढवे- धावडे सोसायटीत ते बिबट्या की, रानमांजर

खडकवासला - कोंढवे- धावडे येथील श्रीकृष्णनगरी सोसायटीच्या प्रवेशद्वारातून बिबट्या सदृश्य प्राणी सोसायटीत आला आणि दुसऱ्या बाजूला तो गेला आहे. दरम्यान ‘सीसीटीव्ही’ फुटेज मध्ये बिबट्या सदृश्य प्राण्याची हालचाल आढळली आहे.

हि हालचाल ‘सीसीटीव्ही’ मध्ये पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दिसत आहे. सोसोयटीतील ज्येष्ठ व्यक्ती पवार पहाटे चालत सुरक्षारक्षकाने प्रवेशद्वाराकडे येत आहे. प्राण्याची हालचाल त्यांना दिसली. आणि सुरक्षारक्षकाचे देखील त्याकडे लक्ष गेले. माजी सरपंच नितीन धावडे यांनी वन विभागाने माहिती कळविली. वन विभागाने माहिती घेण्यासाठी बचाव पथक (रेस्क्यू टीम) पाठविले होते. त्यांनी संबधित ‘सीसीटीव्ही’ फुटेज पाहिले असता ते रानमांजर असावे. असे त्यांनी सांगितले.

बिबट्याचा बछडा सोसायटीच्या आत येऊन तो पुढे एनडीएच्या भिंतीकडे गेला. बछडा मोठा झाला आहे. मागील तीन चार महिन्यात पाच- सहा वेळा त्याला पाहिले आहे. रानमांजर पूर्ण काळे असते. हे तसे नव्हते. त्याच्या दोन पायातील अंतर जास्त दिसत आहे.

- संदीप मनवळ, सुरक्षारक्षक

यापूर्वी सोसायटीच्या जवळ असलेल्या हॉटेल पिकॉकच्या परिसरात बिबट्या दिसला होता. त्यामुळे, बिबट्या या परिसरात आलेला आहे. वन विभागाने आम्हाला काय काळजी घ्यायची याची माहिती दिली आहे.

- दत्तात्रेय मोरे, श्रीकृष्णनगरीचे ग्रामस्थ

या सोसायटीच्या मागे आमच्या शेताच्या लगत राष्ट्रीय संरक्षण विभागाची भिंत पडलेली आहे . तसेच, ओढ्याच्या बाजूने हरीण, माकड, मोर, रान डुक्करासह अनेक प्राणी आमच्या शेतात येतात. शेतातील पीक खातात. त्यामुळे बिबट्या असेल का नाही माहित नाही.

- अमित तोडकर, शेतकरी

एनडीए परिसरात बिबट्याचा वावर आहे. श्रीकृष्णनगरी सोसायटीत दिसलेला बिबट्या आहे कि रानमांजर हे सांगता येत नाही. तो प्राणी चालत गेलेली जागा कॉंक्रिटचा भाग आहे. यामुळे, त्या प्राण्याच्या पायाचे ठसे मिळालेले नाहीत. बिबट्या असल्यास कशी काळजी घ्यायची याची सूचना स्थानिकांना दिली आहे. रेस्कू टीमचा मोबाइल नंबर सोसायटीत दिल आहे.

- वैशाली हाडवळे, वनपाल

टॅग्स :LeopardCat