खड्डे दुरूस्तीसाठी सुळे यांची सेल्फी मोहिम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

कोंढवा - कात्रज ते उंड्री बाह्यवळण आणि बोपदेव घाट परिसरातील खड्ड्यांसोबत खासदार सुप्रिया सुळे यांनी सेल्फी काढले. तसेच, ते सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना सोशल मीडियावर टॅग केले आहेत. 

कोंढवा - कात्रज ते उंड्री बाह्यवळण आणि बोपदेव घाट परिसरातील खड्ड्यांसोबत खासदार सुप्रिया सुळे यांनी सेल्फी काढले. तसेच, ते सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना सोशल मीडियावर टॅग केले आहेत. 

राज्यात एकही रस्ता असा नाही, ज्यावर खड्डे नाहीत. त्यामुळे अपघात वाढले आहेत. या खड्ड्यांमुळे हकनाक गेलेले बळी याला जबाबदार कोण? राज्यातील सर्व रस्त्यांवर हेच चित्र आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्रिमहोदय मात्र ‘खड्डे दाखवा आणि हजार रुपये मिळवा’ असे आवाहन करतात. म्हणून त्यांच्या आवाहनाला भरभरून प्रतिसाद देण्यासाठी खड्डे असलेले रस्ते त्यांना दाखवून देऊया ! मी सुरवात केली आहे, तुम्ही करताय ना, असे म्हणत कात्रज ते उंड्री व बाेपदेव घाट रस्त्यावरील फोटो काढून ते #Selfieswithpotholes असे फोटो सोशल मीडियावरून मंत्री महोदयांना सुळे यांनी टॅग केले आहे.

Web Title: kondhawa pune news supriya sule selfi campaign for road repairing