कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 मे 2018

बाजारात 7 हजार पेट्यांची आवक; केशरला 40 रुपयांचा भाव
पुणे - कोकण हापूस आंब्याचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीमुळे कर्नाटक हापूस आंब्याची आवक घटली असून, ती पुढील आठवड्यात वाढेल, असा अंदाज आहे. 

बाजारात 7 हजार पेट्यांची आवक; केशरला 40 रुपयांचा भाव
पुणे - कोकण हापूस आंब्याचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीमुळे कर्नाटक हापूस आंब्याची आवक घटली असून, ती पुढील आठवड्यात वाढेल, असा अंदाज आहे. 

दर वर्षी साधारण मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात कोकणातील हापूस आंब्याची आवक कमी होत जाते. त्यानुसार कोकणातील हापूस आंब्याचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. पुढील पंधरा दिवस कच्च्या आंब्याची आवक कमी होत जाईल. वाढलेल्या तापमानामुळे फळ तयार होण्याचे प्रमाण अधिक असल्याने पुढील काळात तयार आंब्याची उपलब्धता अधिक होईल. आंबा उत्पादक हंगामाच्या शेवटी अपेक्षित भाव मिळत नसल्याने पुण्यातील बाजारात आंबा विक्रीला पाठविण्याऐवजी तो ‘पल्प’ तयार करण्यासाठी पाठविण्यास प्रारंभ करतात. त्यामुळे आवक कमी होत जाईल, असे व्यापारी अरविंद मोरे यांनी सांगितले. कोकणातील साधारणपणे ७ हजार पेट्यांची रविवारी आवक झाली.

कर्नाटक हापूस आंब्याचा हंगाम हा जून महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापर्यंत चालणार असून, सध्या तो बहारात आला आहे. विधानसभा निवडणुकीमुळे कर्नाटक हापूसची आवक रविवारी कमी झाली. सुमारे २० हजार पेट्या इतकी आवक झाली आहे. तुलनेत आवक कमी झाल्याने कर्नाटक हापूसच्या भावात थोडी वाढ झाली असून, बुधवारपासून आवक पुन्हा वाढेल, असा अंदाज व्यापारी रोहन उरसळ यांनी व्यक्त केला. केशर आंब्याची आवक वाढू लागली आहे. सातारा, वाई, महाबळेश्‍वर भागातून त्याची सुमारे २०० ते २५० क्रेट इतकी या आंब्याची आवक झाली. त्याला प्रतिकिलोला ४० ते ६० रुपये इतका भाव मिळाला.

Web Title: Konkan Hapus mango Season