पुणेकरांची कोकणला पसंती

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 जानेवारी 2019

पुणे - प्रजासत्ताक दिन आणि त्याला जोडून आलेला रविवार यामुळे दोन दिवस शहराबाहेर पडण्याच्या ‘प्लॅन’मध्ये बहुतांश पुणेकरांनी कोकण 
आणि त्याखालोखाल महाबळेश्‍वरला पसंती दिली आहे. 

प्रजासत्ताकदिनी सकाळी ध्वजवंदन करून दुपारपर्यंत पुण्याबाहेर पडून संध्याकाळी कोकणात उतरण्याचे नियोजन काही पुणेकरांनी केले आहे. तर, काही जणांनी थेट प्रतापगड आणि महाबळेश्‍वर असा ‘प्लॅन’ केला आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणची हॉटेल्स, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची (एमटीडीसी) रिसॉर्ट जवळपास ‘फुल्ल’ झाली आहेत, अशी माहिती वेगवेगळ्या पर्यटन कंपन्यांनी दिली. 

कोकणातील रत्नागिरी, गणपतीपुळे, दिवे- आगार, अलिबाग याबरोबरच तळकोकणातील सिंधुदुर्ग, मालवण आणि तारकर्लीला पुणेकरांनी प्राधान्य दिले आहे. एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे म्हणाले, ‘‘प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पर्यटनासाठी बाहेर पडणाऱ्यांनी कोकण, महाबळेश्‍वरबरोबरच पानशेत, कार्ला, भंडारदरा येथे बुकिंग केले आहे.’’

रिसॉर्टमध्ये कार्यक्रम 
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने रिसॉर्टमध्ये स्थानिक कलाकारांच्या मदतीने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा अभिनव प्रयोग एमटीडीसीने केला आहे. पौर्णिमा महोत्सवाच्या यशस्वी आयोजनानंतर आता प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात येणार आहे. त्यात कथाकथनापासून अभंगांपर्यंतच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांचा समावेश केला आहे, अशी माहिती काळे यांनी दिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Konkan preferred by pune people