दिवाळीच्या सुटीत कोकणाला पसंती; समुद्र किनाऱ्यावरील रिसॉर्टचे 60 टक्के आरक्षण 

दिवाळीच्या सुटीत कोकणाला पसंती; समुद्र किनाऱ्यावरील रिसॉर्टचे 60 टक्के आरक्षण 

पुणे - कोरोनाच्या उद्रेकात तब्बल सहा महिने घरात बसलेल्या पुणेकरांनी दिवाळीच्या सुटीतील पर्यटनासाठी कोकणाला पसंती दिली आहे. समुद्र किनाऱ्यावरील पर्यटन स्थळांच्या रिसॉर्टचे 60 टक्के आरक्षण झाले आहे. त्यातही सिंधुदुर्ग, गणपतीपुळे आणि हरिहरेश्‍वरला पुणेकर पर्यटकांनी प्राधान्य दिल्याची माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने दिली. 

राज्यात कोरोना उद्रेक नियंत्रणात येत आहे. सर्व क्षेत्र टप्प्या-टप्प्याने खुली होत आहेत. त्यात पर्यटनाचाही समावेश आहे. गेल्या सहा महिन्यांपासून बहुतांश पुणेकर घरात बसले आहे. दिवाळीच्या सुटीच्या निमित्ताने पुणेकर आता बाहेर पडण्याचा "प्लॅन' करत आहेत. त्यात समुद्र किनाऱ्यांना प्राधान्य दिले असल्याचे दिसते, अशी माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी दिली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ते म्हणाले, ""राज्यातील थंड हवेची ठिकाणे, समुद्र किनारे येथे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या सर्वाधिक आहे. त्यातही बहुतांश पर्यटक दिवाळीनंतर कोकणात उतरत आहेत. त्यामुळे तेथे बुकिंग वाढले आहे. त्यात तारकर्ली, हरिहरेश्‍वर यांना सर्वाधिक पसंती आहे. पर्यटकांच्या स्वागतासाठी सर्व रिसॉर्ट सज्ज केले आहे. तसेच, कोरोनाच्या संसर्गापासून पर्यटकांची पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे.'' 

""समुद्र किनारे पर्यटनासाठी अद्यापही खुले केलेले नाहीत. मात्र, अनलॉकच्या प्रक्रियेमध्ये समुद्र किनाऱ्यावरील पर्यटनही खुले होतील. त्यामुळे आम्ही बुकिंग केले आहे,'' असे मत संतोष कदम यांनी व्यक्त केले. ""नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत समुद्र किनारे पर्यटनासाठी जरी खुले केले नाही, तरीही रिसॉर्टमध्ये बसूनच समुद्राचा आनंद घेता येईल. कारण, गेले सहा महिने प्रचंड ताणात घालवले आहेत. त्या वातावरणातून बाहेर येण्यासाठी समुद्रावरचे मोकळे वारे महत्त्वाचे वाटते,'' असेही त्यांनी सांगितले. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

""लोणावळा आणि महाबळेश्‍वर येथील थंडी आवडते. पहाटे गर्द धुक्‍यामध्ये हरवलेल्या सह्याद्रीची शिखरे पाहण्याचा एक वेगळाच आनंद असतो. त्यासाठी आम्ही यंदा लोणावळ्याला जाणार आहे,'' असे संदीप परब यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com