होळीसाठी कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 मार्च 2017

मुंबई - मुंबईतील चाकरमान्यांना होळीसाठी कोकणात जाता यावे यासाठी कोकण रेल्वेतर्फे या कालावधीत दोन विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. सीएसटी ते करमाळी आणि सीएसटी ते मडगाव यादरम्यान या विशेष गाड्या धावणार आहेत.

गाडी क्रमांक 01033 सीएसटी-करमाळी 10 मार्चला रात्री 11 वाजून 55 मिनिटांनी सुटणारी ही गाडी करमाळीला दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता पोहचणार आहे. परतीच्या प्रवासासाठी क्रमांक 01034 करमाळी-सीएसटी 11 मार्चला दुपारी 1 वाजून 35 मिनिटांनी सुटणारी ही गाडी सीएसटीला रात्री 12 वाजून 10 मिनिटांनी पोहचेल. गाडी क्रमांक 01089 सीएसटी-मडगाव ही 12 मार्चला रात्री 11 वाजून 55 मिनिटांनी सुटणार आहे आणि ती मडगावला दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजता पोहचेल. परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक 01090 मडगाव-सीएसटी 13 मार्चला सायंकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी सुटेल आणि सीएसटीला दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजून 15 मिनिटांनी पोहचेल. या दोन्ही विशेष गाड्यांना दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड व थिविम या स्थानकांत थांबा देण्यात आला आहे.

Web Title: konkan railway special train for holi