विमा ग्राम पुरस्काराने 'कोपर्डे' दुसऱ्यांदा सन्मानित

जयंत पाटील
शनिवार, 15 डिसेंबर 2018

विमा ग्राम योजनेंतर्गत मिळालेल्या रकमेतून गावची विकासकामे केली जातील. आम्ही सलग दुसऱ्या वर्षी हा पुरस्कार मिळवला आहे. कोपर्डे हवेली ग्रामपंचायतीला सन २०१८- १९ या वर्षाचा देखील विमा ग्राम पुरस्कार मिळवेल याची खात्री आहे. 

- राजेंद्र सावंत ग्रामविकास अधिकारी 

कोपर्डे हवेली : कोपर्डे हवेली ग्रामपंचायत भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या विमा ग्राम योजनेत दुस-यांदा पात्र ठरल्यामुळे पारितोषिक धनादेश वितरण कार्यक्रम नुकताच घेण्यात आला.

कार्यक्रमप्रसंगी विमा ग्राम योजनेंतर्गत कोपर्डे हवेली ग्रामपंचायतीला एक लाख रुपयांचा धनादेश मुख्य व्यवस्थापक रामचंद्र भजनावळे यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी शाखा व्यवस्थापक सुनील कोळी, उप शाखा व्यवस्थापक एस. एम. पाटील, विकास अधिकारी ए. टी. भिसे, मिलिंद जोशी, विमा प्रतिनिधी रामचंद्र चव्हाण, आनंदराव चव्हाण, सह्याद्री कारखान्याचे संचालक शंकर चव्हाण, सकाळ तनिष्का व्यवस्थापक लक्ष्मण चव्हाण, सरपंच मेघा होवाळ, उपसरपंच लक्ष्मण चव्हाण, तनिष्का लीडर अरुणा चव्हाण, नेताजी चव्हाण, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र सावंत, लालासो चव्हाण, पोपट चव्हाण, वसंतराव चव्हाण, भरत चव्हाण उपस्थित होते. 

यावेळी पाटील यांनी आयुर्विमा महामंडळाकडून गावासाठी राबवित असलेल्या विविध योजनांची माहिती सांगून ग्रामस्थांना विम्याचे महत्व सांगण्यात आले. सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी कोपर्डे हवेली हे गाव तिस-यांदा विमा ग्राम करण्याचा संकल्प केला. 

Web Title: Koparde honored for the second time in the Insurance Village award