कोरेगाव भीमाला मानवंदनेसाठी जाणार - आंबेडकर

Bhimrao-Ambedkar
Bhimrao-Ambedkar

भोसरी - बौद्ध समाज हा शांतता प्रिय आहे. कोरेगाव भीमातील विजय स्तंभाला मानवंदना देण्याची गेल्या अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. पूर्वजांच्या शौर्यांचे आणि गौरवशाली परंपरेचे स्मरण करणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. त्यामुळे मीही एक जानेवारीला कोरेगाव भीमाला मानवंदनेसाठी जाणार असल्याचे मत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी इंद्रायणीनगर येथे व्यक्त केले. 

देहूरोडमधील ऐतिहासिक धम्मभूमीच्या वर्धापन दिनानिमित्त भीमराव आंबेडकर आले होते. या वेळी त्यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यकर्त्यांशी हितगूज साधले. सायंकाळी भोसरीतील इंद्रायणीनगरातील कार्यकर्त्यांशीही संवाद साधला. 

आंबेडकर म्हणाले, ‘‘गेल्या वर्षी कोरेगाव भीमामध्ये उसळलेल्या दंगलीनंतर राज्य सरकारने तेथे सभा घेण्याची परवानगी नाकारली होती. मात्र, भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिस प्रशासनाची भेट घेऊन बाजू मांडली. त्यानंतर काही अटींवर सभेस परवानगी दिली आहे. कोरेगाव भीमामधील सोहळा शांततेत व्हावा, यासाठी पोलिसांना समता सैनिक दलही मदत करणार आहे. मुंबईतील चैत्यभूमीवर कोरेगाव भीमापेक्षा दहापटीने अधिक अनुयायी येऊन कार्यक्रम शांततेत पार पाडतात. डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेचा आदर करणारा समाज हा सोहळाही शांततेत पार पाडेल.’’

वंचित बहुजन आघाडीविषयी ते म्हणाले, की आता सर्व बहुजन समाज बहुजन वंचित आघाडीत एक झाला आहे. काही स्वयंम्‌ घोषित पुढारी हे समाजाचा विचार न करता फक्त स्वतःचाच विचार करतात. मात्र, वंचित आघाडीमध्ये अठरा पगड जातीच्या जनसमुदायाचे एकत्रीकरण झाल्याने येत्या निवडणुकीत वंचित आघाडी निश्‍चितपणे प्रभाव टाकेल, असे भीमराव आंबेडकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com