शिरूर विधानसभेची उमेदवारी गुलदस्तात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 मार्च 2018

कोरेगाव भीमा - ‘शिरूर विधानसभेच्या उमेदवारीबद्दल जनमत, पाठिंबा व पक्षनेतृत्वाशी चर्चा करून उमेदवारीबद्दल योग्य निर्णय घेऊ,’ असे सांगत अजित पवार यांनी आज काही फुटांच्या अंतरासाठी दोघांनाही आपल्या गाडीत बसवले खरे, मात्र कोणाच्याही उमेदवारीस स्पष्ट संकेत न देता हा निर्णय गुलदस्तातच ठेवला.

शिरूर विधानसभेच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माजी आमदार अशोक पवार व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद हे दोघेही प्रबळ इच्छुक आहेत. दोघांच्या कार्यकर्त्यांनी मोर्चेबांधणीस सुरवातही केली आहे. पेरणे गावातच अजित पवार यांच्या उपस्थितीत दोन कार्यक्रम घेऊन आपापल्या परीने शक्तिप्रदर्शनही करण्यात आले. हा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी उमेदवारी नेहमीप्रमाणे ऐनवेळी न करता लवकरात लवकर जाहीर करावी, अशीही या दोघांच्या गोटातून मागणी होत आहे. त्यामुळे याबाबत आज पेरणे येथील सभेत अजित पवार काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. या वेळी बोलताना प्रदीप कंद यांनी तर विधानसभेसाठी प्रबळ इच्छुक असल्याचे सांगत उमेदवारीचा निर्णय लवकर जाहीर करावा, अशी जाहीर मागणी केली होती.

Web Title: koregaon bhima news shirur vidhansabha candidate ncp ajit pawar politics