कोरेगाव भीमा दंगलीला माओवादी कारणीभूत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 एप्रिल 2018

पुणे - कोरेगाव भीमा दंगलीला माओवादी विचारांच्या संघटना आणि फुटीरतावादी गट कारणीभूत आहेत. जंगलातला माओवाद जेवढा घातक तेवढाच शहरातला माओवाद धोकादायक आहे. या दंगलीत आंबेडकरी व हिंदुत्ववादी गटांनी कोणताही पूर्वनियोजित कट रचला नसल्याचे भाजपचे माजी खासदार प्रदीप रावत यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेल्या सत्यशोधन समितीने सांगितले.

कोरेगाव भीमा दंगलीला प्रक्षोभक परिस्थिती निर्माण होताना पोलिसांनी सतर्कता दाखवली नाही. तसेच, स्थानिक पोलिस चुकीची माहिती सांगून सरकारची दिशाभूल करत आहेत. दंगलीच्या ठिकाणी शस्त्र नेले जात असताना पोलिसांनी अटकाव करणे गरजेचे होते, असे मत रावत यांनी व्यक्त केले.  

माजी लष्करी अधिकारी कॅप्टन स्मिता गायकवाड, लोकशाही जागर मंचाचे सागर शिंदे, पुणे बार असोसिएशनचे माजी सचिव ॲड. सत्यजित तुपे, मातंग क्रांती सेनेचे सुभाष खिलारे, मराठा युवा संघटनेचे दत्ता शिर्के, प्रदीप पवार यांनी एकत्रितपणे कोरेगाव भीमा, वढू परिसरात जाऊन प्रत्यक्षदर्शी असणाऱ्या लोकांशी संवाद साधून अहवाल तयार केल्याचे समितीने पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी समितीतील स्मिता गायकवाड यांनी चित्रफितीद्वारे दंगलीतील काही व्हिडिओ दाखवून, हा अहवाल लवकरच मुख्यमंत्र्यांपुढे सादर करणार असल्याचे सांगितले.

अहवालातील मुद्दे
 दंगल घडताना संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे कोरेगाव भीमा परिसरात गेले नव्हते
 दंगलीवेळी उपस्थित असणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी करावी
 एल्गार परिषदेत जातीय तेढ निर्माण करणारी पुस्तके वाटली, अशा पुस्तकांवर कायमस्वरूपी बंदी घालावी
 कबीर कला मंच, रिपब्लिकन पॅंथर या संघटनांची चौकशी करावी 

Web Title: koregaon bhima riot maoist pradeep rawat