फटांगडे मृत्यूप्रकरणी तिघांना अटक    

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 जून 2018

पुणे - कोरेगाव भीमामधील हिंसाचाराच्या घटनेदरम्यान जमावाच्या हल्ल्यात बळी पडलेल्या राहुल फटांगडे या युवकाच्या मृत्यूप्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) तिघांना अटक केली आहे. या प्रकरणातील आणखी चार संशयितांचा शोध एका चित्रफितीच्या आधारे घेण्यात येत आहे. दरम्यान, अटक केलेल्या तिघांविरुद्ध पोलिसांनी न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केले आहे.

कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी जमलेल्या आंबेडकरी अनुयायांवर एक जानेवारीला दगडफेक झाली होती. त्यातून उसळलेल्या दंगलीमध्ये पेरणे फाटा येथील पेट्रोल पंपाजवळ राहुल फटांगडे यास जमावाकडून बेदम मारहाण झाली होती. जमावातील एकाने डोक्‍यात दगड मारल्याने फटांगडे याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा तपास सरकारने ‘सीआयडी’कडे सोपविला होता. तपासात  एक चित्रफीत आढळून आली आहे. या चित्रफितीच्या आधारे तीन जणांना १० जानेवारीला रोजी अटक करण्यात आली. यात नगर जिल्ह्यातील दोन आणि औरंगाबादमधील एकाचा समावेश आहे. 

राहुल फटांगडे मृत्यूप्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. उर्वरित चार जणांचा शोध एका चित्रफितीच्या आधारे घेतला जात आहे. त्यांची नावे किंवा अधिक माहिती आढळल्यास संबंधित व्यक्तींनी ‘सीआयडी’च्या पुणे कार्यालयाशी संपर्क साधावा. 
- प्रसाद अक्कानवरु, पोलिस अधीक्षक, ‘सीआयडी’

Web Title: Koregaon Bhima violence Three people arrested on the death of the fatangade