कोरेगाव पार्क परिसरात, सायलेन्सरच्या देशी-विदेशी मोटर सायकलचा मोठा आवाज

उच्चभ्रू व शांत परिसर समजल्या जाणाऱ्या भागातील नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
Koregaon Park area loud noise pollution foreign motorcycle Silencer
Koregaon Park area loud noise pollution foreign motorcycle Silencer

मुंढवा : कोरेगाव पार्क भागात मोठ्या आवाजाचा सायलेन्सर असलेल्या देशी-विदेशी मोटर सायकल रात्री-अपरात्री उशिरापर्यंत जोराने आवाज करत धावतात. त्यामुळे उच्चभ्रू व शांत परिसर समजल्या जाणाऱ्या भागातील नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. अशा वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी पोलीस उपायुक्त वाहतूक विभाग यांना नागरिक कृती समितीचे अध्यक्ष योगेश पिंगळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

कोरेगाव पार्क मधील विविध लेनमधून मोठा आवाज करत फिरत असतात. तसेच प्रामुख्याने लेन नंबर ६ व ७ मध्ये हॉटेल्स मोठ्या प्रमाणावर असल्याने येथे देखील अशा बाईक्स वेगाने जोराचा आवाज गोंगाट करत धावत असल्याचे चित्र दिसते. त्याचा या भागातील लहान मुले, महिला व वयोवृद्ध नागरिकांना या आवाजाचा त्रास होतो.

वाहतुक विभागाने इंदोरी फटाक्याचा आवाज काढणाऱ्या व सायलेन्सर मध्ये बदल करून मोठा आवाज करणार्‍यां दुचाकींवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. ती योग्य व अभिमानास्पद आहे. परंतु कोरेगाव पार्क हा शांत भाग म्हणून ओळखला जातो या भागात अनेक हॉटेल्सचे आकर्षण असल्याने रात्री-अपरात्री व वीकेंडला या भागामध्ये शहरातील अनेक कॉलेजचे विद्यार्थी व तरूण मुले मोठ्या आवाजाचा सायलेन्सर असलेल्या देशी-विदेशी मोटर सायकलवर आवाज करीत फिरत असतात. त्यामुळे ध्वनी प्रदूषण बरोबरच गर्दीच्या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे पोलीस उपायुक्त वाहतूक विभाग यांना पिंगळे यांनी दिलेल्या निवेदनात नमुद केले होते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com