कोथरूड, एरंडवण्यात अभूतपूर्व कोंडी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

पौड रस्ता - पौड रस्ता, कर्वे रस्ता, एसएनडीटी कॅनॉल रस्ता, लॉ कॉलेज रस्ता, एरंडवणा दवाखाना, सेंट्रल मॉल, गुळवणी महाराज पथ या मुख्य व उपरस्त्यांवर मंगळवारी सकाळपासून  अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली. वाहनांना मार्ग काढून देताना पोलिसांची तारांबळ उडत होती. या कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याच्या चार घटना पौड रस्ता व कर्वे रस्ता परिसरात घडल्या. 

मेट्रोचे काम सुरू केले तेव्हा पर्यायी रस्ते उपलब्ध करून देणे आवश्‍यक होते. मेट्रोने वाहतूक सुरळीत होण्यासाठी काही कर्मचारी देण्याचे कबूल केले होते; परंतु तसे झालेले दिसत नाही. त्यातच पीएमपीच्या बस रस्त्यात बंद पडण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे वारंवार कोंडी होत असते. आज सकाळी संततधार पावसामुळे या काेंडीत भर पडली. 

नदीपात्रातील रस्ता बंद
नदीपात्रातील रस्त्यावर पाणी असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होता. त्यामुळे या रस्त्याने जाणारी सर्व वाहने कर्वे रस्ता, म्हात्रे पूल रस्त्यावर आली. मेट्रोमुळे पौड रस्ता व कर्वे रस्ता अरुंद झाला आहे. मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आलेल्या वाहनांमुळे ही कोंडी झाली, असे पोलिसांनी सांगितले. 

Web Title: Kothrud Erandwane traffic jam