esakal | Kothrud: शास्रीनगर मध्ये गुंडांचा धुमाकुळ
sakal

बोलून बातमी शोधा

शास्रीनगर मध्ये गुंडांचा धुमाकुळ

कोथरुड : शास्रीनगर मध्ये गुंडांचा धुमाकुळ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोथरुड : कोथरुडच्या शास्रीनगर मधील दत्तमंदिर येथे रात्री दोन गटात झालेल्या भांडणामुळे दगड व काचेच्या बाटल्यांची फेकाफेक झाली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पतित पावन संघटनेचे जालिंदर उर्फ पप्पू टेमघरे यांनी सांगितले की, येथे सार्वजनिक संडासाच्या जागेवर काही लोकांनी अनाधिकृत रित्या कबुतरांच्या ढाबळी बांधलेल्या आहेत. त्यावरुन संध्याकाळी भांडणे झाली. त्यानून 20 ते 25 जणांच्या जमावाने परस्परांवर दगड व बाटल्या फेकून मारल्या. त्यामुळे चाळीमध्ये सर्वत्र काचेच्या बाटल्या व दगड पडले होते. घाबरुन सर्वांनी स्वतःच्या घराचे दरवाजे बंद करुन घेतले. येथील दहशत मोडून काढा असे आम्ही कोथरुड पोलिसांना कळवले.

कोथरुडचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक महेंद्र जगताप म्हणाले की, भांडण करणारांची नावे कोणीही सांगितली नाहीत. त्यामुळे एफआयआर नोंदविण्यात आलेला नाही. मात्र आम्ही चौकशी करुन संबंधितांचा शोध घेत आहोत. येथील गस्त वाढवली असून कबुतराची ढाबळ काढणार आहे.

loading image
go to top