esakal | कोथरूड : पंडित दीनदयाळ शाळेत मास्क, चॉकलेट देऊन स्वागत
sakal

बोलून बातमी शोधा

पंडित दीनदयाळ शाळेत मास्क, चॉकलेट देऊन स्वागत

पंडित दीनदयाळ शाळेत मास्क, चॉकलेट देऊन स्वागत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोथरूड : पंडित दीनदयाळ उपाध्याय इंग्लिश मिडीयम शाळेत आज शाळेला हँडसफ्री सॅनिटायझर स्टँड व विद्यार्थ्यांना मास्क व चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी त्रिसूत्री चे पालन केल्यास सर्वांचे आरोग्य उत्तम राहील आणि पुन्हा शाळा बंद करण्याची वेळ येणार नाही असे शिक्षण समिती अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या. विद्यार्थ्यांनी यावेळी फलकावर आम्ही त्रिसूत्री चे पालन करू, मास्क चा वापर करू, हात सातत्याने धुवून सॅनिटाईझ करू व सुरक्षित अंतर पाळू असे लिहून अभ्यासाला प्रारंभ केला.

आय टीच संस्थेचे गीतेश शिनगारे यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी नगरसेवक दीपक पोटे, माधुरी सहस्त्रबुद्धे, पुनीत जोशी, अनुराधा एडके,हर्षदा फरांदे, राज तांबोळी उपस्थित होते. संदीप खर्डेकर यांनी सूत्रसंचालन केले तर मुख्याध्यापिका एलिझाबेथ काकडे यांनी आभार प्रदर्शन केले.

loading image
go to top