कोथरुडकरांची डाळ कधी शिजणार...

tur dal1.jpg
tur dal1.jpg

कोथरुड (पुणे) : सरकारतर्फे रेशनधारकांना डाळ वाटण्यात येईल असे केंद्रीय मंत्र्यांनी जाहीर केले होते. त्यानुसार तीन दिवसापूर्वी पुण्यातील काही भागात डाळ वाटण्यात आली परंतु कोथरुडकर मात्र डाळीच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे कोथरुडकरांची डाळ कधी शिजणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

लोकमान्य वसाहत येथे राहणारे सखाराम औटे म्हणाले की, रेशनवरचा गहू, तांदूळ मिळवण्यासाठी दहावेळा दुकानात हेलपाटे मारावे लागले. चार-चार तास लाईनमध्ये थांबावे लागले तेव्हा रेशन मिळाले. आता हडपसर भागात डाळ वाटल्याचे समजले पण कोथरुडमध्ये अजून डाळीचा पत्ताच नाही.

रेशनदुकानदारांनी नाव न देण्याच्या अटीवर सांगितले की, वरुन जसे धान्य येईल तसे आम्ही वाटत आहोत. लोकांना समजावून सांगताना, उत्तर देताना आम्हाला नाकेनऊ होत आहे. सरकारने असे सांगितले, तसे सांगितले असे म्हणत लोक आमच्याकडे येतात. त्यांना समजावून सांगितले तरी विश्वास बसत नाही. पोलिस, डॉक्टरांप्रमाणेच आम्हाला लोकांना सामोरे जावे लागत आहे. पण आम्हाला कोणी कोरोना योध्दा म्हणत नाही.  

एप्रिल, मे, जून या महिन्याकरीता नियमित रेशन घेणा-या कार्डधारकांना एक किलो डाळ देण्यात येणार आहे. तूर किंवा हरभरा डाळ मोफत मिळणार आहे. यातील एप्रिल महिन्याची डाळ अजून मिळाली नसून मे महिन्याच्या डाळीचे वाटप सध्या सुरु आहे. प्रत्येक महिन्याला पुणे शहरासाठी 130 मेट्रीक टन तूर डाळ व 195 मेट्रीक टन चनाडाळ मिळणार आहे. एप्रिल व जून महिन्याची डाळ जून महिन्यात देण्यात येईल असे पुरवठा अधिकारी यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा


रेशनच्या क विभागाचे अधिकारी रमेश सोनवणे यांनी सांगितले की, सध्या कोथरुडमध्ये मोफतचा तांदूळ वाटण्याचे काम सुरु आहे. येत्या दोन दिवसात कोथरुडमध्ये डाळ वाटपाचे काम सुरु होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com