आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

पुणे - शहरातील विविध संस्था-संघटनांनी आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. यानिमित्ताने विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचेही आयोजन केले होते. संगमवाडी येथील समाधिस्थळी अनुयायांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

पुणे - शहरातील विविध संस्था-संघटनांनी आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. यानिमित्ताने विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचेही आयोजन केले होते. संगमवाडी येथील समाधिस्थळी अनुयायांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या मागासवर्गीय विभागातर्फे साळवे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. विभागाचे अध्यक्ष मुकेश धिवार, राहुल तायडे, पीयूष धिवार उपस्थित होते. काँग्रेसच्या क्रीडा सेलचे अध्यक्ष सचिन सावंत यांनीही साळवे यांना अभिवादन केले. रोहित गुरव, रमेश ईरला, प्रशांत ठाकरे व वेदांत जाधव उपस्थित होते. कसबा ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रवीण करपे यांनी साळवे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. गौरव बोराडे, जयदीप परदेशी, नरेश नलावडे उपस्थित होते. राष्ट्रीय समाज पक्षातर्फे सविता जोशी आणि  श्रद्धा भांतग्रेकर यांनी साळवे यांना अभिवादन केले. निर्मला सावंत, अर्चना पाटील, अलका पाटील, वंदना हाके उपस्थित होते. 

भारतीय मातंग युवक संघटनेच्या वतीने अध्यक्ष विठ्ठल साठे यांनी समाधीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी शंकर वाघमारे, पांडुरंग दुबळे, सनी भोंडवे, राजेंद्र भोंडवे, समीर डोलारे, राजू अडागळे आदी उपस्थित होते. दलित स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष दादासाहेब सोनवणे यांनीही अभिवादन केले. या वेळी नीलेश वाघमारे, नारायण डोलारे, संजय केंजळे, सुजित रणदिवे, सविता दोडके आदी उपस्थित होते. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पक्ष कार्यालयात, साळवे यांच्या प्रतिमेला पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष पंडित कांबळे यांनी पुष्पहार अर्पण केला. चेतन तुपे-पाटील, राजू गिरे, वैजनाथ वाघमारे व नामदेव पवार उपस्थित होते. पक्षाच्या प्रभाग क्रमांक १९ चे संजय गाडे यांनीही साळवे यांनी अभिवादन केले. मधुकर चांदणे, आयूब शेख, वैभव जाधव उपस्थित होते. दलित पॅंथरतर्फे प्रदेशाध्यक्ष सुखदेव सोनवणे यांनी समाधीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. प्रकाश साळवे, शुभम सोनवणे, हसन पूनावाला व प्रेम जोगदंड उपस्थित होते.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सामाजिक न्याय विभाग आणि फुले-साठे-आंबेडकर विचार फाउंडेशनतर्फे साळवे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानिमित्ताने फाउंडेशनच्या विविध शाखांतर्फे सामाजिक उपक्रम घेतले. यामध्ये कर्णबधिर मुलांना श्रवणयंत्रांचे, तर गरजू महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले.

दृष्टिहीनांसाठी नेत्रचिकित्सा शिबिर घेण्यात आले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाचे शहर उपाध्यक्ष मोहन सोनवणे, नीतेश जोशी, योगिता सावंत, अनिल शेंडगे उपस्थित होते.

दलित युवा संघर्ष समिती, विलास चौरे समाजसेवा प्रतिष्ठान, सामाजिक समरसता मंच, मांगीरबाबा देवस्थान, लहुजी शक्ती सेना (केशवनगर), झोपडपट्टी सुरक्षा दल, कामगार सुरक्षा दल, रिपब्लिकन मातंग सेना, दलित महासंघ आणि पुणे नवनिर्माण सेवा (संघ) आदी संस्था-संघटनांकडूनही साळवे यांना अभिवादन करण्यात आले.

Web Title: Krantiveer Lahuji vastad Salve Birth Anniversary