esakal | कृषिकन्येची ट्रॅक्टरवर कमांड लय भारी ! 
sakal

बोलून बातमी शोधा

ankita baravkar.jpg


वरवंड येथील अंकिता बारवकर हिचे कौतुक; भाजपच्या मोर्चात नेतमंडळींकडून सन्मान 

कृषिकन्येची ट्रॅक्टरवर कमांड लय भारी ! 

sakal_logo
By
रमेश वत्रे

केडगाव (पुणे) : भाजपने दौंड तालुक्यातील चौफुला येथे आयोजित केलेल्या रॅलीत ट्रॅक्टर चालवत सहभागी झालेली कृषिकन्या पाहून नेते मंडळींसह सर्वांनाच सुखद धक्का बसला. सायकल शिकण्याच्या वयात या युवतीने ट्रॅक्टरच्या स्टेअरिंगवर मिळविलेली कमांड पाहून तिचे सर्वांनी कौतुक केले. 

‘अहो, मास्क घाला, गळ्यात कशाला अडकवलाय? पीएमपी कंडक्टरांची वाढली डोकेदुखी

वरवंड (ता. दौंड) येथील बारावीत शिकणारी अंकिता गोरख बारवकर ही युवती ट्रॅक्टरद्वारे शेतातील सर्व प्रकारची कामे करते. चौफुला येथे भाजपच्या शेतकरी सन्मान रॅलीत सहभागी झाल्याने तिची ही कर्तबगारी सर्वांना ठाऊक झाली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार राहुल कुल, भाजप किसना मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस वासुदेव काळे यांच्या हस्ते तिचा सन्मान करण्यात आला. 

Video : ‘जंबो’नं दिलं नवं आयुष्य; रुग्णांनी व्यक्त केली कृतज्ञता

अंकिता ही गोरख झुंबर बारवकर या शेतकऱ्याची मुलगी आहे. पण, तिचा पेहराव मात्र एकदम आधुनिक असतो. त्यात फेटा बांधून ट्रॅक्टर चालविल्याने या मराठमोळ्या रणरागिनीने सर्वांच्या नजरा आपल्याकडे खेचल्या. जीन्स पॅन्ट, जीन्सचे जॅकेट, टि शर्ट, पायात बूट यामुळे अंकिता एकदम मराठमोळी, पण रणरागिनी दिसत होती. वयाच्या अठरा वर्षांपर्यंत सायकलही चालवता येत नाही, अशा मुली आपण पाहतो. पण, अंकिता हिने काल १६८ ट्रॅक्टरच्या गर्दीत महामार्गावरून सफाईदारपणे ट्रॅक्टर ट्रॅालीसह चालवत मुलीही काही कमी नाहीत, हेच उपस्थितांना दाखवून दिले. या रॅलीत पुणे- सोलापूर महामार्गावरून वरवंड ते चौफुला असा तीन किलोमीटरचा प्रवास तिने लिलया पार केला. 

पुण्यात कोरोनाचा दुसरा टप्पा येण्याच्या शक्‍यतेने महापालिकेने असे केले नियोजन

अंकिता ही वडील गोरख बारवकर यांच्याबरोबर सुटीत ट्रॅक्टर चालवायला शिकली. बारवकर यांच्याकडे बोर व डाळिंबाची बाग आहे. अंकिता ही ट्रॅक्टरद्वारे फळबागांना औषध फवारणी करत शेतातील मशागतीची कामे करते. बोर व डाळिंबाचे पॅकिंग करते. ती दुचाकी व कारही चालवायला शिकली आहे. वरवंडच्या गोपीनाथ विद्यालयात ती बारावी सायन्समध्ये शिकत आहे. तिला औषध निर्माण शास्त्र या विषयात उच्च शिक्षण घ्यायचे आहे. तीला दहावीत ७६ टक्के गुण मिळाले आहेत. अंकिता हिच्या वयातील मुलांचे मोबाईल वेड पालकांना चिंता करायला लावते. मात्र, मोबाईल व सोशल मीडियाचे फारसे आकर्षण नसलेली अंकिता सुटीत आईला घरकामात मदत करते किंवा वडिलांसोबत शेतामध्ये काम करते. 
 

मला एक मुलगा व एक मुलगी आहे. मुलगा व्यवसायात आहे. मुलीला खूप शिकवायचे आहे. मुलगी शिकली तर दोन्ही घरची प्रगती होते. मला मुलगा झाला, तेव्हा मी पेढे वाटले नव्हते. पण, अंकिता हिचा जन्म झाला, तेव्हा मात्र मी पाच किलो पेढे वाटले होते. मला माझ्या मुलीबद्दल फार अभिमान आहे. 
- गोरख बारवकर 
 

loading image