स्वयंप्रेरित होण्याचा ‘कृषिक’चा मंत्र!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 जानेवारी 2019

बारामती - गेल्या चार दिवसांत दोन लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी भेट दिलेल्या कृषिक २०१९ चा आज समारोप झाला. पुढील वर्षी याच दिवशी, याच वेळी भेटण्याचा संकल्प करीत राज्यभरातील शेतकऱ्यांनी स्वयंप्रेरित होण्याचा मंत्र घेतला.

बारामती - गेल्या चार दिवसांत दोन लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी भेट दिलेल्या कृषिक २०१९ चा आज समारोप झाला. पुढील वर्षी याच दिवशी, याच वेळी भेटण्याचा संकल्प करीत राज्यभरातील शेतकऱ्यांनी स्वयंप्रेरित होण्याचा मंत्र घेतला.

कृषिक प्रदर्शनाच्या आज शेवटच्या दिवशी सकाळी सातपासूनच मुंबई, नवी मुंबई, ठाण्यातील शहरी चाकरमान्यांसह गुजरात, मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांनी तसेच महाराष्ट्रातील नंदुरबारच्या आदिवासी भागापर्यंतच्या शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. साप्ताहिक सुटीचा योग साधून पुण्यासह आसपासच्या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी कृषिक पाहण्यासाठी गर्दी केली. जगभरातील १२ कृषी प्रगत देशांमधील तंत्रज्ञान पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी या वर्षी युवा शेतकऱ्यांनी सर्वाधिक संख्येने गर्दी केली, हे यंदाच्या कृषिकचे वैशिष्ट्य होते.

शेती शेतकऱ्यांना नैराश्‍येकडे घेऊन चालली आहे आणि नवी पिढी शेतीविषयी नकारात्मक आहे, हा समज मोडीत काढणारा प्रत्यय आजच्या कृषिक प्रदर्शनातील गर्दीने दिला

दुष्काळ इष्टापत्ती मानू... 
महाराष्ट्राला मागील दोन महिन्यांपासून दुष्काळाचे चटके बसत आहेत. दररोज प्रत्येक जिल्ह्यातील एक-दोन गावे पाणीटंचाईत मोडत असतानाच्या पार्श्वभूमीवर कृषिक प्रदर्शन भरवले गेले. मात्र, दुष्काळ आणि शेतीतील समस्या येतच राहतील. शेतीत नवे काहीतरी केले, तरच पुढचे दिवस आपले आहेत, असे मानत हा दुष्काळ आपत्तीपेक्षा इष्टापत्ती समजून शेतीत नवनिर्माण करू, असा संकल्प करीत शेतकरी येथे आले. गेली तीन दिवस शेतकऱ्यांचा दिवसभर प्रात्यक्षिकांच्या ठिकाणी गराडा होता. अवजारांची माहिती घेण्यासाठी शेतकरी तासनतास घालवत होते. कलम केलेल्या भाजीपाल्याचे रोप आठ रुपयांना मिळेल, मात्र त्याचा मला फायदा कसा होईल, रोगकिड किती कमी राहील, हे रोप पाण्याला किती काळ तग धरेल, असे प्रश्न शेतीत उतरलेली तरुणाई तज्ज्ञांना विचारत होती. तेव्हा या शेतीचे उद्याचे भविष्य आणखी उज्ज्वल राहील याची प्रचिती आली.

Web Title: Krushik Agriculture Exhibition