‘कुकडी’च्या साठ्यात वाढ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

नारायणगाव - कुकडी प्रकल्पातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू झाल्याने प्रकल्पाच्या उपयुक्त पाणीसाठ्यात दोन दिवसांत २.४ टीएमसी (७.८९ टक्के) वाढ झाली आहे. कुकडी प्रकल्पात आजअखेर २१.७ टीएमसी (७१.१५ टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.

दरम्यान, पूर नियंत्रणासाठी वडज धरणातून मीना नदीत आज सकाळपासून ३ हजार १२२ क्‍युसेक पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे मीना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून, नागरिकांना दक्षतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता के. आर. कानडे, उपकार्यकारी अभियंता सपना डावरे यांनी दिली.

कुकडी प्रकल्पाअंतर्गत डिंभे, वडज, पिंपळगाव जोगे व माणिकडोह धरण पाणलोट क्षेत्रात १४ ऑगस्टपासून पाऊस सुरू झाला आहे. ता. १६ ऑगस्ट रोजी धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने प्रकल्पाच्या उपयुक्त पाणीसाठ्यात २.४ टीएमसी वाढ झाली आहे.

प्रकल्पाअंतर्गत वडज धरणात ८२.५७ टक्के, तर डिंभे धरणात ९६.६१ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. पिंपळगाव जोगे धरणाच्या मृतसाठ्यात वाढ होऊन धरणात ०.९३ टीएमसी (२४ टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे, अशी माहिती शाखा अभियंता प्रकाश मांडे यांनी दिली. मेअखेर कुकडी प्रकल्पात २ टीएमसी (६.८५ टक्के) उपयुक्त पाणीसाठा होता. जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त होत होती. मात्र, १४ ऑगस्ट ते १६ ऑगस्टदरम्यान धरण पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

धरणातील उपयुक्त पाणीसाठा
येडगाव- ६९.९५ टक्के (१.९५), माणिकडोह- ५६.९४ टक्के (५.७९), वडज- ८२.५७ टक्के (०.९६), पिंपळगाव जोगे- २४.०४ (०.९३५), डिंभे- ९६.६१ टक्के (१२.०७), चिल्हेवाडी- ७२.७७ (०.६३). 

Web Title: Kukadi project water storage increase