कचऱ्यापासुन खत निर्मिती; कुणाल आयकॉन सोसायटीचा उपक्रम

रमेश मोरे
रविवार, 2 डिसेंबर 2018

जुनी सांगवी : पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन सोसायटीत सोसायटी अंतर्गत ओला व सुका कचऱ्यापासुन खतनिर्मिती प्रकल्प नुकताच सुरू करण्यात आला आहे. साधारण चार ते पाच हजार लोकसंख्या असलेल्या या सोसायटीतील ओला व सुका कचरा संकलित करून सोसायटी परिसरातील प्रकल्पात मशिनरीद्वारे खत निर्मिती करण्यात येते. या उपक्रमाचे स्थानिक नगरसेवक विठ्ठल ( नाना) काटे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले असा आहे.

जुनी सांगवी : पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन सोसायटीत सोसायटी अंतर्गत ओला व सुका कचऱ्यापासुन खतनिर्मिती प्रकल्प नुकताच सुरू करण्यात आला आहे. साधारण चार ते पाच हजार लोकसंख्या असलेल्या या सोसायटीतील ओला व सुका कचरा संकलित करून सोसायटी परिसरातील प्रकल्पात मशिनरीद्वारे खत निर्मिती करण्यात येते. या उपक्रमाचे स्थानिक नगरसेवक विठ्ठल ( नाना) काटे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले असा आहे.

कुणाल आयकॉन सोसायटीतील एकुण टन ओला व सुका कचरा संकलित केला जातो. ओला व सुका कचऱयाचे वर्गीकरण करून तो सोसायटीतील प्लॅटमध्ये संकलित करण्यात येतो. सुरूवातीला सोसायटीच्या एकाच विभागात हे काम सुरू करण्यात आले होते ते आता सोसायटीच्या दोन भागात सुरू करण्यात आले आहे. एकुण एक टन ओल्या व सुक्या कचऱ्यापासुन येथे खतनिर्मिती करण्याचा प्रकल्प येथे सुरू करण्यात आला आहे. सोसायटीतील सर्व नागरीक या उपक्रमात योगदान देत आहेत. यात संकलिक  झालेला कचरा प्लॅटपर्यंत पोचविण्यासाठी जागोजागी कचरा संकलनाचे नियोजन करण्यात आले आहे. जागेवरच ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण होत असल्याने हे काम सोप्या पद्धतीने करण्याचा मानस सोसायटी सभासदांकडुन करण्यात आला आहे. यासाठी सोसायटीच्या प्रत्येक कोपरा, आणि आवारात ओला व सुका कचरा संकलनासाठी कचरापेटी ठेवण्यात आल्या आहेत.

सोसायटी परिसर व उद्यानातील पडणारा पालापाचोळा, घरातील कचरा एका ठिकाणी संकलित केला जातो. येथील कचऱ्यापासुन खत निर्मिती या उपक्रमाची आयआयटी संस्थेकडुनही भेट देवुन दखल घेण्यात आली आहे. तीन महिन्यात संकलित कचऱ्याची पहिली खेप (बॅच) निघणार आहे. सुरूवातीला या खताचा सोसायटीतील घरातील फुलझाडे, उद्यानातील झाडांना या खताचा उपयोग करण्यात येणार आहे. तर, गरजेपेक्षा आधिक संकलित झालेल्या खताची मागणीनुसार विक्री करणार असल्याचे सोसायटीच्यावतीने सांगण्यात आले. या खतनिर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन स्थानिक नगरसेवक विठ्ठल नाना काटे, पिंपरी चिंचवड महापालिकेचे आरोग्य विभागाचे अधिकारी प्रभाकर तावरे, यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सोसायटीचे विनोद सुर्वे, चंद्रशेखर सोनपोठकर, मकरंद गुर्जर, प्रविण ढमाले, नटराज श्रीनिवासन, जॉन डिसुझा आदी सोसायटीतील रहिवाशी नागरिक सहकारी उपस्थित होते.

कचऱ्यापासुन खत निर्मिती हा उपक्रम सर्वच मोठ्या सोसायट्यांनी राबविल्यास कचरा बाहेर येणार नाही.खऱ्या अर्थाने पिंपरी चिंचवड शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असल्याचे अशा प्रकल्पाकडे पाहुन वाटते. माझ्या प्रभागातील सोसायट्यांसाठी लागणारी मदत व सहकार्यांसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
- विठ्ठल नाना काटे, नगरसेवक.

"सोसायटी अंतर्गत कचऱ्याचे संकलन करून खतनिर्मिती प्रकल्प उभारावा, ही संकल्पना सर्वांसमोर मांडली असता सर्व सदस्यांनी या उपक्रमात सहभागी होवुन योगदान केल्याने हा प्रकल्प उभा राहिला आहे. एकुण एक टन कचरा संकलित करून प्रकल्पातुन खत निर्मिती करण्यात येत आहे.''
- विनोद सुर्वे, चेअरमन,कुणाल आयकॉन सोसायटी

''कचऱ्यापासुन खत निर्मिती ही संकल्पना सर्वांनी अंगीकारल्यास खऱया अर्थाने शहर स्मार्ट होईल.''
- मकरंद गुर्जर सोसायटी सदस्य रहिवाशी

 

Web Title: Kunal Icon Society's initiative to Produce fertilizer of Waste