कुंडमाउली मंदिराचा काळे परिवाराकडून कायापालट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 जानेवारी 2019

चास - ‘आपण आयुष्यभर कमवलेला पैसा साठवून ठेवून तणावात राहण्यापेक्षा हाच पैसा सत्कर्माला लावल्यास मानसिक समाधान तर मिळतेच; पण तणावमुक्त आयुष्य जगता येते,’’ असे मत रंगनाथ काळे यांनी चास (ता. खेड ) येथे आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.

निसर्गसंपदेचा अमूल्य ठेवा असलेले भीमा नदीच्या तीरावर वसलेले, नयनरम्य अश्‍या रांजणखळग्यांनी वेढलेले चास गावचे ग्रामदैवत श्री कुंडमाउली देवीचे मंदिर म्हणजे पर्यटकांबरोबरच भाविकांचे श्रद्धास्थान आहे.

या मंदिर व परिसराचा कुंडमाउली परिसर विकास मंडळाच्या माध्यमातून जीर्णोद्धार सुरू असून, मंदिराच्या सुंदरतेत भर घालण्याचे काम निवृत्त अधिकारी रंगनाथ काळे यांनी सर्वप्रथम निवृत्तीनंतर आलेल्या पैशातून सुमारे ६५ हजार रुपये खर्च करून मंदिर व नदिकिनारा यामध्ये संरक्षित जाळी बसवली. मंदिर प्रांगणात ६० हजार रुपये खर्चून सिमेंटचा  कोबा केला.

मंदिराच्या भव्य प्रांगणात उन्हाळ्यात व पावसाळ्यात तसेच यात्रा उत्सवाच्या काळात भाविकांना सावली मिळावी म्हणून सुमारे एक लाख रुपये खर्चून भव्य सभामंडप उभा केला. मंदिराच्या प्रवेशद्वारावर सुमारे एक लाख सत्तर हजार रुपये खर्चून सुंदर कमान बांधली. या कमानीमुळे मंदिराच्या सौंदर्यात भर पडली आहे. 

या मंदिराच्या कमानीचा लोकार्पण सोहळा करताना रंगनाथ काळे, रमणबाई काळे, वासंती क्षीरसागर, अर्चना केदारी, उमेश मिहेर, सचिन काळे, शिल्पकार सतीश तारू व कमलाकर पाटील, मंडळाचे मारुती शिंदे, दत्तात्रेय रासकर, मयूर तनपुरे, हरिश्‍चंद्र मुळूक,  उपसरपपंच भीमराव गायकवाड, रंगनाथ ढमढेरे, शिवराज कपाळे, सोपान राऊत, किसन रासकर, पुजारी बबन देवकर, बाळू देवकर उपस्थित होते. आता कुंडमाउली परिसर विकास मंडळाच्या माध्यमातून मंदिरासमोर भव्य दीपमाळ उभारली जाणार आहे.

Web Title: Kundmauli Temple Development by Kale Family