तळेगावात कामगारांचे आंदोलन स्थगित

तळेगाव एमआयडीसी - एल ॲण्ड टी कंपनीच्या उपोषणकर्त्या कामगारांना लिंबूपाणी पाजताना आमदार बाळा भेगडे, ॲड. विजय पाळेकर आदी.
तळेगाव एमआयडीसी - एल ॲण्ड टी कंपनीच्या उपोषणकर्त्या कामगारांना लिंबूपाणी पाजताना आमदार बाळा भेगडे, ॲड. विजय पाळेकर आदी.

तळेगाव स्टेशन - एल ॲण्ड टी डिफेन्स कंपनीच्या कामगारांनी सुरू केलेले ठिय्या आंदोलन कंपनीचे अधिकारी, आमदार संजय भेगडे आणि शिवक्रांती कामगार संघटनेचे नेते ॲड. विजय पाळेकर यांच्यात सोमवारी (ता. ११) रात्री उशिरा झालेल्या चर्चेनंतर अखेर स्थगित करण्यात आले.

तळेगाव एमआयडीसीतील एल ॲण्ड टी कंपनीने नऊ कायमस्वरूपी कामगारांना कुठलीही पूर्वसूचना न देता कामावरून बडतर्फ केल्यामुळे २८ जानेवारीपासून ८९ कामगारांनी ठिय्या आंदोलन सुरू केले होते. तसेच शुक्रवारपासून (ता. ८) नऊ जणांनी आमरण उपोषण चालू केले होते. कंपनी प्रशासनाकडून कसलाही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आंदोलन चिघळण्याची शक्‍यता लक्षात घेता सोमवारी रात्री भेगडे यांच्यासह शिवक्रांती कामगार संघटनेचे सरचिटणीस ॲड. विजय पाळेकर, गणेश भेगडे, पंचायत समिती सभापती गुलाबराव म्हाळसकर, शांताराम कदम यांनी कंपनी व्यवस्थापनाचे ब्रिजेश कालरा आणि मनुष्यबळ विभागाचे एम. लक्ष्मणन यांच्याशी चर्चा केली. तोडगा निघाल्याने कामगारांसह उपोषणकर्त्यांनी लिंबूपाणी पिऊन आमदारांच्या हस्ते उपोषण सोडले. 

चर्चेनुसार ९ निलंबित कामगारांचे प्रकरण न्यायप्रविष्ट असून यासंदर्भात न्यायालयाचा निर्णय मान्य करण्याचे कामगार प्रतिनिधी आणि कंपनी व्यवस्थापनाने मान्य केले. कंपनीने कामावरून कमी केलेल्या कंत्राटी कामगारांना पुन्हा कामावर घेण्याबरोबरच संपकाळातील कायमस्वरूपी ४० कामगारांचा पगार देण्याबाबत कंपनी व्यवस्थापनाने सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे सांगण्यात आले. पाळेकर यांनी मंगळवारी (ता. १२) आंदोलनास पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे आभार केले. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र राजमाने, रवींद्र साठे, राजेंद्र पवार, रोहन आहेर, विक्रम गव्हाळे, दिलीप नखाते, महेश बिराजदार, महेंद्र शिंदे यांनी चर्चेत सहभाग घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com