पोटाला चिमटा घेऊ, पण पोरांना चांगले शिक्षण देऊ

आम्हाला नाही शिकता आले. पोटाला चिमटा घेऊन दप्तर, पाटी, पेन्सिल, कपडे खरेदी करून पोरांना शाळेत पाठवायचे आहे.
Labours
Labourssakal
Summary

आम्हाला नाही शिकता आले. पोटाला चिमटा घेऊन दप्तर, पाटी, पेन्सिल, कपडे खरेदी करून पोरांना शाळेत पाठवायचे आहे.

उंड्री - कोरोना वाढतोय म्हणत्यात, पोरांची शाळा सोमवारी सुरू होणार आहे. पण, आठवड्यातून चार-दोन दिवस हाताला काम मिळते, त्यातून पोटपुजा कशी करायची. आम्हाला नाही शिकता आले. पोटाला चिमटा घेऊन दप्तर, पाटी, पेन्सिल, कपडे खरेदी करून पोरांना शाळेत पाठवायचे आहे, असा सूर उंड्री (ता. हवेली) चौकातील मजूर अड्ड्यावरील मजुरांनी आळवला.

अनिता कांबळे, सुनीता कांबळे, हारूबाई कांबळे म्हणाल्या की, उंड्री चौकातील मजूर अड्ड्यावर नांदेड, परभणी, सोलापूर, लातूर, उदगीर, कर्नाटक परिसरातील सुमारे ५०० मजूर कामासाठी थांबतात. ठेकेदार आला की, त्याच्याकडे काम मागण्यासाठी धाव घेतात. त्यातील काहींना काम मिळते, तर काम मिळाले नाही म्हणून नाराज होऊन पुन्हा दुसऱ्या ठेकेदाराची वाट पाहतो. कोरोना कमी झाल्यापासून रोजगार मिळू लागला आहे.

आता मिळेल ते काम करू जास्त वेळ थांबू आणि मुलांना शिकवू, असाच ध्याय मजूर वर्गाने घेतला आहे. कोरोना महामारीमुळे मागिल दोन वर्षांपासून पोरांना शाळेत पाठवता आले नाही. आता कोरोनाचा ज्वर कमी झाल्यामुळे आता सोमवारी शाळा सुरू होत असल्याने समाधान वाटत आहे. पोरं चार बुक शिकतील, त्यातच आमचे समाधान आहे, असे मजूर अड्ड्यावरील मजूर श्रीपत कांबळे, कर्मवीर कांबळे, सरूबाई गवुलवाड, भिवराबाई कांबळे, जयसिंग गवळी, युवराज धावडे, सनी औताडे, देवदास कांबळे यांनी सांगितले.

नवी कपडे, नवे दप्तर घेऊन मुले शाळेत चालली की लय बरं वाटतय. मुलं शिकतील आणि मोठी झाल्यावर आमचे कष्ट कमी होईल.

- अनिता कांबळे, मजूर, उंड्री चौक

दररोज सकाळी उठायचे आणि मजूर अड्ड्यावर रोजगार मिळेल यासाठी थांबायचे. आमचं आयुष्य मजुरी मागण्यातच चालले आहे. असे आयुष्य आमच्या मुलांच्या वाट्याला येऊ नये, म्हणून आम्हाला मुलांना शिकवायचे आहे.

- ज्ञानेश्वर कांबळे, मजूर- उंड्री चौक

आता काम करतो, त्यापेक्षा चार-दोन तास जास्त काम करू, पण मुलांना चांगले शिकवू. आम्हाला लिहिता-वाचता येत नाही, आम्ही अडाणी राहिलो, पण मुलांना शिकवण्यात आम्हाला समाधान वाटत आहे.

- संजय घाटे, मजूर, उंड्री चौक

बाहेरगावाहून आलेला कष्टकरी वर्ग मोठा आहे. कष्टकरी, कामगारांच्या मुलांमध्ये शिकण्याची आस आहे. त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण शिक्षण संस्था प्रयत्नशील आहेत.

- चंद्रकांत काळे, माजी मुख्याध्यापक, म. फुले हायस्कूल, पिसोळी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com