हिंजवडीत मजूराची आत्महत्या 

संदीप घिसे 
बुधवार, 23 जानेवारी 2019

पिंपरी, (पुणे)- राहत्या घरात गळफास घेऊन मजूराने आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (ता.२२) रात्री नऊच्या सुमारास हिंजवडी जवळील मारूंजी येथे घडली.

पिंपरी, (पुणे)- राहत्या घरात गळफास घेऊन मजूराने आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (ता.२२) रात्री नऊच्या सुमारास हिंजवडी जवळील मारूंजी येथे घडली.

सीमंतो लेट (वय २२, रा. लेबर कँम्प, कोलते पाटील यांची बांधकाम साईड, मारूंजी) असे आत्महत्या केलेल्या मजूराचे नाव आहे. हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचा पश्चिम बंगाल येथील रहिवासी असलेल्या सीमंतो यांनी मंगळवारी (ता.२२) रात्री राहत्या घरात लुंगीच्या साहाय्याने गळफास घेतला. त्याचे इतर सहकारी त्यास जेवण करण्यासाठी बोलाविण्याकरिता आले असता आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला. सीमंतो यास त्वरित वायसीएम रूग्णालय येथे आणले डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. हिंजवडी पोलिस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Web Title: labour Suicide in Hinjewadi

टॅग्स