भारतीय चित्रपटात संस्कृतीचा अभाव- सुभाष घई; ‘इंडियन फिल्म स्टडीज्‌’ पदविका कोर्सचे उद्घाटन

The lack of culture in Indian film says Subhash Ghai at yerwada pune
The lack of culture in Indian film says Subhash Ghai at yerwada pune

येरवडा : भारतीय चित्रपटात पाश्‍चिमात्यांचा पगडा आहे. त्यामुळे चित्रपटात आपल्या माती, संस्कृतीचा लोकांचे जगणे नाही. त्यामुळे आपण ऑस्कर मिळवू शकत नसल्याची खंत प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सुभाष घई यांनी व्यक्त केली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यम व संज्ञापन अभ्यास विभागातील ‘इंडियन फिल्म स्टडीज्‌’ पदविका कोर्सच्या उद्घाटन प्रसंगी घई बोलत होते. यावेळी भारतीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदुम, माध्यम व संज्ञापन अभ्यास विभागाच्या प्रमुख डॉ. माधवी रेड्डी, प्रा. विश्राम ढोले, प्रा. आकाश ढोपेश्‍वरकर, प्रा. अमित सोनवणे उपस्थित होते.

घई म्हणाले, ''अापल्याला आपल्या संस्कृतीचा गर्व आहे. पण तो चित्रपटाच्या माध्यमातून प्रभावीपणे पोचवता आले नाही. आपले काही चित्रपट केवळ ‘ऑस्कर’साठी नॉमिनेट झाली पण ते तेथे थांबली. आपल्या चित्रपटात पाश्‍चिमात्या संस्कृतिचे अंधानुकरण आहे. मात्र इराण, इराक आणि इतर लहान देशांनी बनविलेले चित्रपटात त्यांच्या संस्कृतीचे, लोकांचे तेथील भूमीचे प्रतिबिंब दिसते. त्यामुळे त्या चित्रपटांना ऑस्कर पुरस्कार मिळतात. देशातील बंगाली चित्रपट निर्मात्यांचा अपवाद सोडला तर जगतीक पातळीवर आपले चित्रपट अयशस्वी ठरले आहेत.''

चित्रपट क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर स्वअध्ययन महत्त्वाचे आहे. हे क्षेत्र गांभिर्याने घ्यायला हवे. याच भूमीत जन्मलेले व वाढलेले असल्यामुळे येथील विविध विषयांवर चित्रपट तयार करता आले पाहिजे. त्यामुळे प्रथम आपला समाजाला प्राधान्य दिले गेले पाहिजे. लोकांना चित्रपट कसा पहावा हे शिकविले गेले पाहिजे. चित्रपटातील मूल्य, संदेश समजून सांगता आले पाहिजे. चित्रपट हे अभिव्यक्तीचे प्रभावी माध्यम आहे. भारतीय जुन्या चित्रपटातील संदेश हे भारतीय संस्कृतीचे खोलवर रुजलेले मूळ असल्याचे घई यांनी सांगिलते.

मगदूम म्हणाले, ''फिल्म संग्रहालय हे केवळ चित्रपटांचे भांडार नसून ते चित्रपट साक्षरतेचे माध्यम आहे. केरळ, पश्‍चिम बंगालमध्ये फिल्म क्लब व फिल्म सोसायट्यांच्या माध्यमातून चित्रपट समजून घ्यावा कसा, हे शिकविले जाते. भारतात जगातील सर्वांधिक चित्रपटांची निर्मिती होते. मात्र चित्रपटाची भाषा, चित्रपट समजून सांगणाऱ्याची दुसरी पिढीच शिल्लक नाही.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com