धक्कादायक ! कोरोना संशयितांना अर्ध्या रस्त्यातूनच परतावे लागले घरी...

जागृती कुलकर्णी
मंगळवार, 7 जुलै 2020

माणिकबागेतील घटना ; सिंहगड महाविद्यालयातील क्वारंटाइन सेंटरमध्ये तपासणी किटचा अभाव 

सिंहगडरस्ता (पुणे) : माणिकबागेतील एका सोसायटीतील कोरोना रुग्णाच्या संपर्कातील 12 नागरिकांना सिंहगड महाविद्यालयातील क्वारंटाइन सेंटरमध्ये घेऊन जाण्यात येत होते. दरम्यान, तेथे तपासणी कीट उपलब्ध नसल्यामुळे त्यांना अर्ध्या रस्त्यातून घरी परतावे लागले. ही घटना आज(ता.7) घडली. 

आळंदीचे मुख्याधिकारी भूमकर यांची बदली

माणिकबाग येथील एका सोसायटीत ज्येष्ठ महिलेला संसर्ग झाला होता. महापालिकेच्या वतीने येथे खबरदारीच्या उपाययोजनाही राबविण्यात आल्या. त्यानंतर ज्येष्ठ महिलेच्या संपर्कात आलेल्या 12 नागरिकांना तपासणी करण्यासाठी महापालिकेच्या वाहनामध्ये घेऊन जाण्यात आले. त्या वाहनात इतर भागातील नागरिकही उपस्थित होते. मात्र, अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर संबंधित क्वारंटाइन केंद्रात तपासणी कीट उपलब्ध नसल्याचे कारण सांगण्यात आले.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा  

त्यानंतर गाडी माघारी फिरली आणि सर्व कोरोना संशयित नागरिकांना घरी पाठविण्यात आले. या नागरिकांमध्ये काही ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता. घडलेल्या प्रकारामुळे मानसिक त्रास सहन करावा लागला असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, सिंहगड रस्ता परिसरात रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. 

सिंहगड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत रूग्ण संख्या ( सोमवार, ता. 6) 
एकूण - 1386 
उपचार - 644 
कोरोनामुक्त - 704 
मृत्यू -38 

दुरुस्तीसाठी थांबलेल्या लालपरीला अचानक आग

सध्या सगळीकडे शिथिलीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक घराबाहेर पडत आहेत. परिणामी, रूग्णसंख्येत वाढ होत आहे. तपासणी यंत्रणाही कमी पडत आहे. तरीही तपासणी किट उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. या किटवर तपासणी करण्यासाठी संबंधितांना प्रशिक्षण दिले जात आहे. 
- संभाजी खोत, सहायक आयुक्त, सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lack of inspection kit in the quarantine center of Sinhagad College