पुणे : पेट्रोल भरल्यास 'या' सुविधा तुम्हाला मिळतात मोफत

पेट्रोल पंपावर मोफत मिळणाऱ्या सुविधांची वानवा.
petrol pump
petrol pumpSakal Media

कात्रज : सध्या पेट्रोलचे दर हे शंभरी पार गेले असून अशातच पंपावर मोफत मिळणाऱ्या सुविधांची वानवा असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. कात्रज-कोंढवा परिसरातील पेट्रोल पंपावर तर अनेक ठिकाणी मोफत मिळणाऱ्या सुविधांची वानवा असल्याचे दिसून येते.पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडत असून अशात पंपावर हवा भरण्यासाठी सर्रास लूट होतानाच दिसून येत आहे. हवा भरण्यासाठी वेगळे दहा रुपये द्यावे लागत असल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसून येते. पंपांच्या मालकीचे हवा भरण्याचे मशिन काही ठिकाणी बंद अवस्थेत असून पंपाच्या परिसरातच दर आकारून हवा भरून देण्यासाठी उभारण्यात आलेली दुकाने दिसून येतात. तर काही ठिकाणी पंपाची हवा भरण्याची केंद्रे चालू असली तरी ग्राहकांकडून सर्रास दहा रुपये घेण्यात येत असल्याचे दिसून येते. अनेक ठिकाणी हवा भरण्यासाठी विचारणा केल्यास मशिन बंद आहे. कर्मचारी नाही, अशी उत्तरे देण्यात येतात.

petrol pump
पुणे : बाजार समितीने टेम्पो चालकांबाबत घेतला मोठा निर्णय

अनेक ठिकाणी सुलभ शौचालये नाहीत. पिण्याचे पाणीही उपलब्ध नाही. काही ठिकाणी गरज पडल्यास प्राथमिक उपचार पेटी उपलब्ध आहेत. परंतु, काही ठिकाणी ती असल्याचेही दिसत नाही. या सेवा पंपचालकांकडून मोफत पुरविणे बंधनकारक असतानाही याकडे कानाडोळा करण्यात येत असल्याचे चित्र आहे.

पंपावर मोफत मिळणाऱ्या सेवा

१) गाडीत हवा तपासून आणि भरून देणे

२) स्वच्छता गृहाची सोय असणे

३) पिण्याचे पाणी

४) प्राथमिक उपचार पेटी

petrol pump
पिंपरी-चिंचवडमध्ये आज ५३७४ जणांना डिस्चार्ज तर ६४१ नवीन रुग्ण

पंपावर मोफत मिळणाऱ्या सुविधा या ग्राहकांच्या कायदेशीर हक्कात आहेत. सबंधित हक्काचे उल्लंघन करून सुविधा मोफत मिळत नसतील तर पेट्रोल पंप चालकांविरोधात तक्रार करता येते.

- शार्दूल देशपांडे, माहिती अधिकार कार्यकर्ते.

पेट्रोल आणि डिझेल विक्री ही अत्यावश्यक सेवेत असून त्यासोबत असणाऱ्या मोफत सेवा पुरविणे गरजेचे आहे. जर परवडत नाही किंवा अन्य कारणे देऊन सोबत मिळणाऱ्या मोफत सुविधा दिल्या जात नसतील तर हे कायद्याचे उल्लंघन असून त्यांनी अशा पंपचालकांनी पेट्रोल-डिझेल विक्री बंद करावी.

- अली दारुवाला, राष्ट्रीय प्रवक्ते, ऑल इंडिया पेट्रोल डिलर असोसिएशन

petrol pump
पुणे : नदीपात्रातील भराव काढा; जलसंपदा विभागाचे महामेट्रोला आदेश

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com