Video : पुण्यात महिलांच्या मदतीला आता येणार लेडी बाउंसर

Lady Bouncer will  help to women in Pune.jpg
Lady Bouncer will help to women in Pune.jpg

पुणे : नुकतीच घडलेली हैदराबाद येथील घटना असो की, उन्नावमधील... देशात महिला आजही सुरक्षित नसल्याचे या घटनांनी पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर 'अबला नव्हे, आम्ही बाउंसर' म्हणत महिलांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी धनकवडीतील रणरागिनींचा ग्रुप सरसावला आहे. धनकवडी येथील लेडी बाउंसर दीपा परब यांच्या नेतृत्वाखालील हा ग्रुप लवकरच महिलांसाठी हेल्पलाईन सुरू करणार आहे. 



नुकतीच हैदराबाद व उन्नाव येथे बलात्कार व खुनाची घटना घडली. यामध्ये एक सूर होता तो म्हणजे, महिला स्वतःचे सरंक्षण करण्यासाठी असमर्थ असतात. लेडी बाउंसर दीपा परब याकडे मात्र या घटनांकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात. त्या म्हणतात, 'महिला ही कधीच असमर्थ नसते. ती सामना करू शकते. फक्त ती घटना कशी सावरून घ्यायची हे तिला लक्षात यायला हवे. प्रत्येक महिलेने नेहमीच दक्ष राहायला हवे. बऱ्याचदा या घटना अचानक घडत नसतात. त्या ठरवून केल्या जातात. त्यामुळे आपल्यावर कुणी लक्ष ठेवून आहे का, आपण रोज रात्री उशिरा घरी जात असल्यास ते ठिकाण निर्मनुष्य असते का, हे पाहायला हवे. कारण रात्रीच्या अंधारात कोणतीही महिला 'फोकस' होते. अशा वेळी पहिल्यांदा आपल्या मोबाईलचा आधार घेत पहिला पोलिसांना आणि मग कुटुंबीयांना फोन करावा.'' 

मुंबई-पुणे 'एक्सप्रेस वे'वर कारची ट्रकला जोरदार धडक; एक ठार तर, दोन जखमी

पोलिस होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या दीपा यांचे स्वप्न अपुरे राहिले. तेव्हा त्यांनी खासगी माध्यमातून लोकांसाठी काम करायचे ठरविले. जिद्दीच्या जोरावर मेहनत करीत त्या लेडी बाउंसर बनल्या. इतकेच नव्हे, तर त्या अनेक जणींना या क्षेत्रात येण्यासाठी प्रेरणा देत असतात. त्यातून अनेक तरुणी-महिला त्यांच्या संपर्कात आल्या अन्‌ बघता बघता त्यांचा रणरागिनी ग्रुप आकाराला आला. 

डेंग्यू, चिकुनगुनियासह या आजारांवर पुणे विद्यापीठाच्या संशोधकाने शोधले औषध

बाउंसर म्हणजे कुठल्यातरी सेलिब्रिटींना सुरक्षा देणारे, अशीच संकल्पना प्रत्येकाच्या डोक्‍यात असते. मात्र हे बाउंसर 'जनहितार्थ'देखील कार्यरत असतात. दीपा यांच्या रणरागिनी ग्रुपमधील महिला कधी गर्दीच्या ठिकाणी लोकांना जाणे-येणे सुसह्य व्हावे म्हणून काम करतात, तर कधी रस्त्यावर कोंडीच्या वेळी वाहतूक नियंत्रणाचे काम करतात. कधी मंदिरात येणाऱ्या आजी-आजोबांना व्यवस्थित मंदिरात आणणे आणि त्यांना गाडीत बसवून देणे यासाठीही त्या काम करतात. समाजसेवेचा एक भाग म्हणून कुठलेही शुल्क न आकारता त्या रात्री-अपरात्री मनोरुग्ण किंवा असह्य महिलांना सुरक्षित स्थळी पोचविण्याचेही काम या रणरागिनी करतात. 

पिंपरी महापालिका शाळेच्या माध्यान्ह भोजनात सापडल्या उंदराच्या लेंड्या

''महिलांनी दाखवून दिले पाहिजे की, आपण इथे राज्य करतो. त्यासाठी कुठल्याही असह्य क्षणी एखाद्या महिलेला गरज लागू शकते. पोलिस तिथे उपलब्ध होऊ शकतीलच असे नाही. त्यामुळेच आम्ही एक खासगी हेल्पलाईन काढणार आहोत. ज्यावर महिलांना तत्काळ मदत मिळू शकेल.'' 
- दीपा परब, लेडी बाउंसर 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com