लाखणगाव ग्रामपंचायतीने घेतला विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय

आंबेगाव तालुक्यातील पहिले गाव
Lakhangaon Gram Panchayat decides to stop widow practice
Lakhangaon Gram Panchayat decides to stop widow practice

पारगाव - आंबेगाव तालुक्यातील लाखणगाव ग्रामपंचायतीने समाजात प्रचलित असलेले अनिष्ट विधवा प्रथा बंद करणे बाबतचा ठराव सर्वानुमते मंजूर केला असुन अशा प्रकारचा क्रांतिकारी ठराव करणारी लाखनगाव ग्रामपंचायत आंबेगाव तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली असल्याची माहिती सरपंच प्राजक्ता शिरीषकुमार रोडे पाटील यांनी दिली.

येथील ग्रामपंचायतीची मासिक सभा आज बुधवारी ग्रामपंचायतीच्या सरपंच प्राजक्ता रोडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेला उपस्थित उपसरपंच साधना रवींद्र अरगडे, माजी सरपंच दस्तगीर मुजावर, माजी उपसरपंच प्रमोद भागवत, दिपाली वाघमारे, बाळासाहेब धरम, वंदना पडवळ , सुवर्णा पडवळ , अर्चना दौंड या सर्वांनी विचार विनिमय करून समाजात प्रचलित असलेल्या अनिष्ट विधवा प्रथा बंद करणे बाबत सभेत चर्चा करण्यात आली असता समाजात प्रचलित असलेले अनिष्ट विधवा प्रथा बंद करणे बाबतचा ठराव सर्वानुमते मंजूर केला.

यावेळी बोलताना सरपंच सौ. रोडे पाटील म्हणाल्या, राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी वर्षात त्यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा जपला जावा. तसेच आज विज्ञान वादी व प्रगतशील समाज म्हणून आपण वाटचाल करीत असलो तरीही पतीच्या निधनावेळी पत्नीचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातील जोडी काढली जाणे, यासारख्या प्रथांचे समाजात पालन केले जात आहे.

पतीचे निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नीला विधवा म्हणून समाजात वावरत असताना अवहेलनेस सामोरे जावे लागते. या महिलांना त्यानंतर समाजात कोणत्याही प्रकारच्या धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात सहभागी होऊ दिले जात नाही या प्रथांचे पालन होत असल्याने अशा व्यक्तीच्या प्रतिष्ठेने जीवन जगण्याच्या मानवी अधिकाराचे तसेच भारतीय संविधानाने बहाल केलेल्या समतेच्या हिताचे उल्लंघन होते.

त्यामुळे अशा प्रथेचे निर्मूलन होणे ही काळाची गरज आहे त्यामुळे आजपासून लाखणगावात ही प्रथा कायमस्वरूपी बंद करावी असा सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला. ठरावाला सूचक म्हणून दस्तगीर मुजावर व प्रमोद भागवत यांनी अनुमोदन दिले सभेचे इतिवृत्त आदर्श ग्रामसेवक प्रवीण खराडे यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com