लाखो भाविकांनी घेतले ओझरच्या विघ्नहर्ताचे दर्शन 

दत्ता म्हसकर
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

जुन्नर : अंगारक चतुर्थीचा योग व नाताळची सुट्टी यामुळे भाविकांनी मोठ्या प्रमाणावर श्री क्षेत्र ओझर च्या  विघ्नहर्ताच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. दिवसभरात सुमारे तीन ते साडेतीन लाख भाविकांनी दर्शन घेतले. 

जुन्नर : अंगारक चतुर्थीचा योग व नाताळची सुट्टी यामुळे भाविकांनी मोठ्या प्रमाणावर श्री क्षेत्र ओझरच्या विघ्नहर्ताच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. दिवसभरात सुमारे तीन ते साडेतीन लाख भाविकांनी दर्शन घेतले. 

श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शाकुजी कवडे, सचिव गोविंद कवडे, खजिनदार किसन मांडे विश्वस्त पांडुरंग जगदाळे, साहेबराव मांडे, प्रकाश मांडे, देविदास कवडे, विक्रम कवडे, ज्ञानेश्वर कवडे, शंकर कवडे, बबन मांडे, व ग्रामस्थ अविनाश जाधव यांनी पहाटे ४.०० वाजता अभिषेक करून मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. पहाटे चार ते रात्री आकरापर्यंत रांगेत भाविकांनी  दर्शनाचा लाभ घेतला.

सकाळी ७.३० व दुपारी १२.०० वाजता मध्यान्ह आरती करण्यात आली. सकाळी ८.०० वाजता नियमित पोथी वाचन करण्यात आले.सकाळी १०.३० वा.’श्री'स नैवद्य दाखवून भाविकांना खिचडी वाटप करण्यात करण्यात आली. येणाऱ्या भाविकांसाठी मंदिरात दर्शनरांग,शुद्ध पिण्याचे पाणी, खिचडी वाटप, अभिषेक व्यवस्था. देणगी कक्ष, अभिषेक करण्यासाठी शमी वृक्षाखाली व्यवस्था,दर्शन झाल्यानंतर विसाव्यासाठी विघ्नहर बाग, पार्किंग, कमीत कमी वेळेतील दर्शनासाठी मुखदर्शन व्यवस्था इत्यादी व्यवस्था करण्यात आली. सायंकाळी ७.०० वाजता नियमित हरिपाठ करण्यात आला व चंद्रोदयापर्यंत ह. भ. प विठ्ठलबाबा मांडे, ओझर यांचे हरिकीर्तन झाले. त्यांना साथसंगत रामप्रसादिक भजन मंडळ शिरोली यांनी दिली. सर्व वारकऱ्यांना अन्नदान गणपत दगडू बोडके यांनी केले.

Web Title: Lakhs of devotees Visit Ojhar's rebellion