घरीच तयार केले विद्यार्थ्यांनी लाखो मास्क: पुणे विद्यापीठाचा उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 22 April 2020

विद्यार्थ्यांनी सध्या घरात असलेले कापड, दोर्याच्या साह्याने कोणी मशिनवर तर कोणी हाताने मास्क तयार करत आहेत. मास्क कसे तयार करावे, बाबतचे व्हिडिओ विद्यार्थ्यांना पाठविण्यात आले आहेत. तसेच विद्यापीठाच्या संकेतस्थळावरही व्हिडिओ अपलोड करण्यात आले आहेत.

पुणे : नाशिक जिल्ह्यातील दरी येथील दिपाली चौरोस्कर या विद्यार्थ्यांनीने घरी अडीच हजार मास्क बनवून गावात वाटले, इंदापूर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांने फेट्याचे मास्क तयार केले, तर हिमानी देशपांडे हिने हातावर मास्क तयार करून सोसायटीत वाटप केले. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ही झाली मोजकी उदाहरणे पण अशा प्रकारे पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयातील हजारो विद्यार्थी सध्या मास्क बनविण्याच्या कामात व्यस्त आहेत. आतापर्यंत ४७ हजार ८०० विद्यार्थ्यांनी तब्बल ५ लाख मास्क तयार केले आहेत. 
'कोरोना' विरोधातील लढाईत विद्यार्थ्यांचा सहभाग असावा, त्यांनी सामाजिक कार्यात सहभाग घ्यावा यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागासह एनसीसी, विद्यार्थी विकास मंडळ आणि क्रीडा विभागाच्या माध्यमातून लाखो मास्क तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. 

Video : हिरवे-हिरवे गार गालिचे; पिंपरी-चिंचवडमध्ये फुलांचा बहर

विद्यार्थ्यांनी सध्या घरात असलेले कापड, दोर्याच्या साह्याने कोणी मशिनवर तर कोणी हाताने मास्क तयार करत आहेत. मास्क कसे तयार करावे, बाबतचे व्हिडिओ विद्यार्थ्यांना पाठविण्यात आले आहेत. तसेच विद्यापीठाच्या संकेतस्थळावरही व्हिडिओ अपलोड करण्यात आले आहेत.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


यामध्ये पुणे, नाशिक नगर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आहे. 
बुधवार पर्यंत २३५ महाविद्यालयातील ४७ हजार ८०० विद्यार्थ्यांनी तब्बल ५ लाख १ हजार मास्क तयार केले असून, आपापल्या भागात वाटप करत आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांनी केलेले तयार मास्क, वाटप याची माहिती शेअर करण्यासाठी फेसबुकवर खास 'एसपीपीयू कोरोना मुक्ती जनजागृत' हे पेज तयार केले आहे. 

Coronavirus : उरुळी कांचन : कोरोनाग्रस्त महिला इतरांच्या संपर्कात अन्...

तसेच पुणे विद्यापीठाने महाविद्यालयांना जैविक सॅनिटाइजर बनविण्याचे आवाहन केले होते. त्यात १४७ महाविद्यालयांनी सहभाग घेत ४ हजार लिटर पेक्षा जास्त सॅनिटाइजर तयार केले. हे महापालिका, नगर परिषद, ग्रामपंचायत यांना वाटप केले जात आहे. तसेच रक्तदान करण्यासाठी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. 

कोरोनावर आता ‘आयुष’ औषधांची मात्रा 

विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे म्हणाले, "राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विद्यार्थी 'कोरोना' रोखण्यासाठी काम करत आहेत. पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यात ही चळवळ निर्माण झाली आहे. गरजू नागरिकांना मदत करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने दहा कुटुंब दत्तक घ्यावीत असे आवाहन केले आहे, त्यातही मोठा सहभाग आहे. तसेच महाविद्यालयांनी मास्क तयार करावेत यासाठी विद्यापीठ अनुदान देणार आहे. त्यासाठी ऑनलाईन प्रस्ताव मागविले आहेत. 

केवळ दुध विक्री केंद्र दोन तासासाठी राहणार सुरू

मास्क घरी तयार करणारे विद्यार्थी : ४७८००

मास्क निर्मिती करणारे महाविद्यालये : २३५

आत्तापर्यंत तयार झालेले मास्क ५.१ लाख

सॅनिटायझर निर्माण करणारी महाविद्यालये : १४३

सॅनिटायझर निर्माण : ४३०० लिटर'
 

पिंपरीत कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह; पण महिलेचा मृत्यू


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lakhs of masks were created by the students under the initiative of Pune University