स्त्रियांच्या कलागुणांना "आकृती' प्रदर्शनात व्यासपीठ 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मार्च 2017

पुणे - बाळ शिवाजीच्या सोबत बसून त्याला गोष्टी सांगणाऱ्या जिजाबाई, स्त्रीशिक्षणाची गंगा सुरू करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, पहिली अंतराळवीर भारतीय महिला कल्पना चावला यांची व्यक्तिचित्रे, विविधांगी भूमिकांमधील स्त्री व्यक्तिरेखा, तसेच स्त्रियांनी तयार केलेल्या विविध वस्तू पाहण्याची संधी पुणेकरांना मिळाली आहे. निमित्त आहे ललना कला महोत्सवांतर्गत आयोजित आकृती चित्रप्रदर्शनाचे. 

निवेदिता प्रतिष्ठानतर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन केले आहे. माजी उपमहापौर आबा बागूल आणि व्यंग्यचित्रकार खलिल खान यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्‌घाटन झाले. सामाजिक कार्यकर्त्या जयश्री बागूल, प्रतिष्ठानच्या संचालिका ऍड. अनुराधा भारती उपस्थित होते. 

प्रदर्शनामध्ये महिलांनी तयार केलेल्या गृहोपयोगी, सजावटीच्या वस्तू, कपडे, दागिने आणि खाद्यपदार्थ अशा विविध वस्तू पाहायला मिळतील. महोत्सवात "कथाविष्कार' (ता. 10) हा कथाकथनाचा कार्यक्रम, "ऋतुरंग' कार्यक्रमांतर्गत कथक नृत्यरचना व "बंदिनी... स्त्रीजन्माची कहाणी' अशा अजरामर मराठी भावगीतांचा कार्यक्रम (ता. 11) सादर होणार आहे. 

सूत्रसंचालन अंजोर खोपडे यांनी केले, तर शिल्पा अंतापूरकर यांनी आभार मानले. हे प्रदर्शन 11 मार्चपर्यंत सकाळी दहा ते सायंकाळी सहा यावेळेत पद्मावती येथील अण्णा भाऊ साठे सभागृह येथे रसिकांसाठी खुले राहील. 

Web Title: Lalana Arts Festival