हवेलीतील पाच गावांत भूसंपादन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

पुणे - पीएमआरडीएकडून पहिल्या टप्प्यात सातारा महामार्ग ते नगर महामार्गाला जोडणाऱ्या रिंगरोडच्या भूसंपादनाचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. हवेलीतील पाच गावांतील ४२ हेक्‍टर जागा खरेदी करणार असून, त्याबाबत नोटीस बजाविली आहे.

पहिल्या टप्प्यात आंबेगाव खुर्द ते वाघोली, असा ३३ किलोमीटरचा रस्ता होणार आहे. त्यापैकी १६ किलोमीटर रस्त्याची जागा पीएमआरडीएच्या ताब्यात आली आहे. उर्वरित जागेसाठी पीएमआरडीएने पिसोळी, निंबाळकरवाडी, भिलारेवाडी, जांभूळवाडी आणि आंबेगाव खुर्दमधील ४२ हेक्‍टर जागेचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे सादर केला होता. या गावांमधील कोणती जमीन ताब्यात घ्यायची आहे, त्याचे गट क्रमांक आणि संपादित करण्यात येणाऱ्या क्षेत्राची माहिती दिली होती. त्यावर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी तातडीने निर्णय घेत भूसंपादनाचा आदेश काढला आहे.

पाच गावांमधील ४२ हेक्‍टर जागा संपादित करण्यासाठी नोटीस बजावली आहे. जिल्हा प्रशासनाकडून संबंधितांशी चर्चा करून भूसंपादनाचा मोबदला निश्‍चित करणार आहे. 
- नवल किशोर राम, जिल्हाधिकारी

Web Title: Land Acquisition in haveli