पुरंदर विमानतळासाठी मार्च महिन्यापासून भूसंपादनाची प्रक्रिया

Land acquisition process from March to Purandar airport
Land acquisition process from March to Purandar airport

पुणे : पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणीसाठी मार्च महिन्यात पहिल्या आठवड्यात भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांकडून थेट जमीन खरेदी करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जिल्हाधिकारी राम म्हणाले, पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी एकूण दोन हजार 800 हेक्‍टर जमीन अधिग्रहित करण्यात येणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात दोन हजार एकर जमीन अधिग्रहित करण्यात येईल. जमीन अधिग्रहीत करण्‍यासाठी सुमारे तीन हजार कोटी रुपये लागतील. तसेच वर्षभरात भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होईल.

कोण आहेत न्या. मुरलीधर? ज्यांची रातोरात बदली झाली?

शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन भूसंपादन करण्यात येईल. कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल. तसेच भूमिहीन शेतकऱ्यांबाबत नियमानुसार निर्णय घेण्यात येईल. भूसंपादन करताना जमिनीचे दर जिल्हा प्रशासनाकडून निश्चित करण्यात येतील, असे राम यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com