भूसंपादनासाठी पुणे बाजार समिती ठेवी मोडणार

Pune-Market
Pune-Market

पुणे - पुणे बाजार समितीमध्ये मुळशी बाजार समितीचे विलिनीकरण करण्यात आले खरे; परंतु मुळशी बाजारासाठी मान्यता देण्यात आलेल्या शंभर एकर जागेचे भूसंपादन करावे लागणार आहे. त्यासाठी काहीशे कोटी रुपये खर्च आहे. त्यामुळे भूसंपादन खर्चासाठी पुणे बाजार समितीला बॅंकांतील ठेवी (एफडी) मोडाव्या लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुळशी बाजार समितीचे पुणे बाजार समितीमध्ये विलिनीकरण करण्यात आले. त्यासंदर्भात पुणे बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘मुळशी बाजार समितीची स्थापना २००१ मध्ये करण्यात आली. त्या वेळी त्याच्या विकासासाठी ताथवडे येथील शंभर एकर जागा संपादित करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु, जागेवरून न्यायालयीन वाद निर्माण झाले होते. त्यामध्ये भूसंपादनाची प्रक्रिया रखडली. मध्यंतरी उच्च न्यायालयाने जागासंपादनाची प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले.

जिल्हाधिकाऱ्यांकडे तसा प्रस्ताव दाखल आहे. जागेची किंमत काहीशी कोटी रुपये आहे. भूसंपादन खर्च बाजार समितीला द्यावा लागणार आहे. त्यासाठी गरज वाटल्यास ठेवी मोडाव्या लागणार आहेत.’

कार्यक्षेत्र वाढणार
पुणे बाजार समितीचे पुणे शहर, हवेली तालुका, पिंपरी तालुका असे कार्यक्षेत्र होते. त्यामध्ये मुळशी तालुक्‍याचा समावेश झाला.या निमित्ताने मुळशी, मावळ तालुक्‍यासाठी स्वतंत्र उपबाजार होऊ शकेल. नवे उत्पन्नही उपलब्ध होऊ शकेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com