जमिनीवरील अत्याचार थांबवा!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 एप्रिल 2018

पुणे - एक इंच माती तयार होण्यासाठी ५०० वर्षे लागतात. मातीमधील कोट्यवधी जीवजंतूंमुळेच जमीन हा घटक जिवंत असतो. या मातीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी जमिनीवरील अत्याचार थांबवायला हवेत, असा सूर ‘अॅग्रोवन’च्या वर्धापन दिनानिमित्ताने आयोजिलेल्या चर्चासत्रात उमटला. अन्नसुरक्षा, पोषण सुरक्षा आणि मानवी आरोग्याच्या गंभीर समस्येपासून बचाव करायचा असेल तर सुपीक जमीन हाच एकमेव पर्याय आहे, असा इशाराही यानिमित्ताने तज्ज्ञांनी दिला. 

‘अॅग्रोवन’च्या तेराव्या वर्धापन दिनानिमित्ताने  ‘जपाल माती, तर पिकतील मोती’ या विषयावर पुण्यात झालेल्या चर्चासत्राला राज्यभरातील शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. प्रयोगशील शेतकरी प्रताप चिपळूणकर, सुभाष शर्मा, वासुदेव काठे, शास्त्रज्ञ डॉ. अजितकुमार देशपांडे यांनी जमीन सुपीकतेवर मार्गदर्शन केले. ‘अॅग्रोवन’चे संपादक आदिनाथ चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. 

जमिनीतील जिवाणूंना सांभाळा
नैसर्गिक शेती करणारे सुभाष शर्मा यांनी जमिनीतील जिवाणूंना सांभाळण्याचा सल्ला या वेळी दिला. ते म्हणाले, “शेतजमिनीलादेखील हवा, अन्न आणि पाण्याची गरज असते. नैसर्गिक शेतीमुळे मला भरपूर उत्पादन, पैसा आणि आनंददेखील मिळतो.”

प्रताप चिपळूणकर यांनी शेतातील तण हाच आपल्या जमीन सुपीकतेचा मुख्य स्रोत असल्याचा निष्कर्ष मांडला. 

खतापेक्षाही जादा पाण्यामुळे जमिनीची सुपीकता जाते. मिश्रधान्य, हिरवळीची खते, गवत यातून सुपीकता वाढते, असे वासुदेव काठे यांनी नमूद केले. डॉ. अजितकुमार देशपांडे यांनी शेतकऱ्‍यांनी अगदीच सेंद्रिय किंवा फक्त रासायनिक अशी भूमिका न घेण्याचे आवाहन केले.

Web Title: land Atrocity