तोतया चुलता उभा करून लाटली जमीन

Crime
Crime

लोणी काळभोर - तोतया चुलता उभा करून बोगस बक्षीसपत्राच्या माध्यमातून लाखो रुपये किमतीची वडकी (ता. हवेली) येथील पाच गुंठे जमीन लाटू पाहणाऱ्या पुतण्यासह त्याच्या दोन साथीदारांविरोधात लोणी काळभोर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 

वसंत शिवराम निंबरे (वय ६४, रा. ताडीवाला रोड, पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, लोणी काळभोर पोलिसांनी राजेश श्‍यामराव निंबरे (रा. येरवडा, पुणे) या पुतण्यासह भूपेंद्र अनिल जगताप (रा. काळेपडवळ, हडपसर) व भारत बबन मोडक (रा. वडकी) या तिघांविरोधात वडकी हद्दीतील पाच एकर जमिनीची परस्पर विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. राजेश हा वसंत निंबरे यांच्या सख्ख्या भावाचा मुलगा असून, वसंत निंबरे यांनी जमिनीला गिऱ्हाईक पाहण्यासाठी दिलेल्या कागदपत्राचा उपयोग करून फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसंत निंबरे हे ताडीवाला परिसरातील एका इमारतीत मागील दहा वर्षांपासून सुरक्षारक्षाकाचे काम करतात. वसंत निंबरे यांनी काही वर्षांपूर्वी वडकी येथे पाच गुंठे जमीन खरेदी केली होती. दोन वर्षांपूर्वी पैशाची गरज भासल्याने त्यांनी जमीन विकण्याचा निर्णय घेतला होता. जमिनीला खरेदीदार पाहण्यासाठी व जमिनीचा व्यवहार करण्यासाठी वसंत निंबरे यांनी जागेची कागदपत्रे पुतण्या राजेश निंबरे याला दिली होती. मात्र, जागेला खरेदीदार मिळत नसल्याचे राजेश वारंवार सांगत होता.

त्यामुळे वसंत निंबरे यांनी महिनाभरापूर्वी जागेचा सातबारा उतारा काढला. त्या वेळी उताऱ्यावर राजेश याचे नाव असल्याचे त्यांच्या लक्षात आले. 
यावर वसंत निंबरे यांनी जागेची सविस्तर कागदपत्रे काढून पाहिली. त्या वेळी पुतण्या राजेश याने भूपेंद्र जगताप याच्या मदतीने बक्षीसपत्राद्वारे वसंत निंबरे यांच्या जागी भलताच व्यक्ती उभा करून जमीन परस्पर स्वतःच्या नावावर केल्याचे आढळून आले. 

याबाबतचा पुढील तपास लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com