जमीन मोबदला लेखी कळवावा - हर्षवर्धन पाटील

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

इंदापूर - श्री संत तुकाराम महाराज पालखीमार्ग रुंदीकरणामध्ये रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजूचे अंतर आरक्षित करून जमीन अधिग्रहण करून दोन्ही बाजूच्या नागरिकांना समान न्याय द्यावा. तसेच, सरकारने जमिनी ताब्यात घेण्याअगोदर जमीन मोबदला दर लेखी कळवावा, अशी मागणी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बारामती प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्याकडे केली आहे.

तहसील कार्यालयात पाटील यांच्या नेतृत्वाखाली ॲड. कृष्णाजी यादव, मुकुंद शहा, मंगेश पाटील, बापू जामदार, धनंजय पाटील, कैलास कदम, उजेर शेख यांच्या शिष्टमंडळाने निकम यांना निवेदन दिले. या वेळी तहसीलदार श्रीकांत पाटील उपस्थित होते. 

हर्षवर्धन पाटील म्हणाले, ‘‘पालखीमार्गावर संपादित जमिनीचा मोबदला देताना भविष्यातील दर लक्षात घेऊन मोबदला देणे गरजेचे आहे. ज्यांची बांधकामे अपूर्ण आहेत, तसेच त्यांच्या नोंदी लावल्या गेल्या नाहीत, त्यांच्या जमिनीची सरकारदफ्तरी नोंद लावून त्यांना मोबदला मिळणे गरजेचे आहे. रुंदीकरणामुळे ज्यांची व्यवसायाची साधने नष्ट होणार आहेत, त्यांना सरकारने व्यावसायिक गाळे बांधून द्यावेत, पालखीमार्गासाठी जमिनी जाणाऱ्या नागरिकांना प्रकल्पग्रस्तांचा दाखला देऊन प्रत्येकाच्या घरातील एकास सरकारी नोकरी द्यावी, रस्त्याच्या बाजूस असणारी धार्मिक स्थळे सरकारी खर्चाने इतर ठिकाणी बांधावीत, प्रकल्पग्रस्तांना राज्यात टोलमाफी करावी, जमिनीच्या बाबतीत सुधारित राजपत्राची यादी प्रसिद्ध करावी या प्रमुख मागण्या आहेत.

...अन्यथा काँग्रेसतर्फे आंदोलन
इंदापूर शहरातील नियोजित पालखीतळाचे काम वेशीबाहेर होत असून, त्यामुळे मागील साडेतीनशे वर्षांची पालखीची परंपरा मोडण्याचा प्रयत्न चालू आहे. नियोजित पालखी सभामंडप शहराबाहेर न होता श्री नारायणदास रामदास विद्यालयाच्या प्रांगणात न झाल्यास काँग्रेसच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा हर्षवर्धन पाटील यांनी दिला. 

जमीन अधिग्रहण व मोबदला सरकारी नियमांप्रमाणे दिला जाईल. 
- हेमंत निकम, प्रांताधिकारी  

Web Title: land rate harshwardhan patil