esakal | 96 वर्षांचे काम ड्रोनद्वारे केवळ 3 वर्षात पूर्ण; राज्यातील 'एवढ्या' गावांची केली मोजणी
sakal

बोलून बातमी शोधा

land survey  of 1165 villages in the state was completed by drone in just 3 years

आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आणि गतीने जमीन मोजणीचे काम करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला होता.त्यासाठी सर्व्हे ऑफ इंडीयाच्या मदतीने ड्रोनचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात होता. राज्यात प्रायोगिक तत्वावर हा प्रयोग पुरंदर तालुक्‍यातील सोनोरी या गावी राबविण्यात आला होता.

96 वर्षांचे काम ड्रोनद्वारे केवळ 3 वर्षात पूर्ण; राज्यातील 'एवढ्या' गावांची केली मोजणी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : राज्यातील सुमारे 1 हजार 165 गावांच्या गावठाणाची मोजणी भूमी अभिलेख विभागाकडून ड्रोनच्या सहायाने पूर्ण करण्यात आली आहे. ईटीएस मशिन पद्धतीने मोजणी केल्यास एका गावांच्या गावठाणची मोजणी करण्यास किमान तीस दिवसांचा कालवधी लागतो. 1 हजार 165 गावांच्या मोजणीसाठी राज्य सरकारला 96 वर्ष लागली असती. मात्र ड्रोनमुळे केवळ तीन वर्षात हे काम पूर्ण झाले. 
 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आणि गतीने जमीन मोजणीचे काम करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला होता.त्यासाठी सर्व्हे ऑफ इंडीयाच्या मदतीने ड्रोनचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात होता. राज्यात प्रायोगिक तत्वावर हा प्रयोग पुरंदर तालुक्‍यातील सोनोरी या गावी राबविण्यात आला होता. तो यशस्वी झाल्यामुळे राज्यातील सर्व गावठाणांची मोजणी ड्रोनद्वारे करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली होती. त्यासाठी सर्व्हे ऑफ इंडियाला ड्रोनचा वापर करण्यासाठी दोन कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. राज्यात जमिन मोजणीसाठी पहिल्यांदाच ड्रोनचा वापर करण्यात आला. या सुविधेमुळे सर्वसाधारणपणे पध्दतीने गावठाण मोजणी करण्यासाठी 15 ते 30 दिवस लागतात. मात्र ड्रोनच्या सहाय्याने फक्त एका दिवसात मोजणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आले. हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे भूमि अभिलेख विभागाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला होता. 

20 ड्रोनच्या माध्यमातून राज्यातील सुमारे 1 हजार 162 गावांच्या गावठाणाची मोजणी आतापर्यंत पूर्ण करण्यात आली आहे. त्यापैकी सातशे गावांतील रहिवाशांना प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध करून देण्यासंदर्भातील प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तर उर्वरीत 462 गावातील नागरीकांचे प्रॉपर्टी कार्ड तयार करण्यात आले असल्याचे भूमि अभिलेख विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. 

पुण्यात मेट्रो पुल पडल्याची अफवा; प्रत्यक्ष स्थिती कशी आहे पाहा व्हिडिओ

पंतप्रधान यांच्या हस्ते प्रॉपर्टी कार्ड देणार 
ड्रोनच्या माध्यमातून ज्या 462 गावातील गावठाणांची मोजणी आणि त्यावर हरकती-सूचना घेऊन प्रॉपर्टी कार्ड तयार करण्यात आले आहेत. त्या गावातील नागरीकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन प्रॉपर्टी कार्ड देण्याच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम पुढील महिन्यांत होणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान कालवधीत उर्वरीत सातशे गावातील नागरीकांना प्रॉपर्टी कार्ड देता कसे येईल, यासाठीचे काम गतीने सुरू आहे. 

गावठाण मोजणी प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यासाठी भूमि अभिलेख विभागाकडून त्या त्या जिल्ह्यातील सर्व भूमि अभिलेख उपअधिक्षक, सर्व्हेअर यांची मदत घेण्यात आली. त्यामुळे एका तालुक्‍यातील गावठाणांची मोजणी करतेवेळी इतर तालुक्‍यातील सर्व अधिकारी, सर्व्हेअर उपस्थित असल्यामुळे गावठाणांची मोजणी वेळेत होण्यास मदत झाली असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. 

Unlock 4.0 : सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याला 'एवढ्याच' नागरिकांची पसंती; सर्व्हे काय सांगतो पाहा


ड्रोनद्वारे मोजणीचे फायदे 
-ड्रोनद्वारे मोजणी केल्यास वेळेत सर्वाधिक बचत 
-15 ते 30 दिवसांचे काम 1 दिवसात पूर्ण 
-ड्रोनद्वारे मोजणीची अचूकता अधिक 
-ड्रोनद्वारे मोजणीमध्ये खर्चातही 50 टक्के बचत होऊ शकते. 


नागरीकांना काय फायदे होणार 
-मोजणी झालेल्या गावातील नागरीकांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार 
-जागेचे वाद मिटण्यास मदत होणार 
-मालमत्तेवर कर्ज घेणे सहज शक्‍य होणार 
-मालकी हक्काचा कायदेशीर पुरावा तयार होणार 
-गावातील गायरान जमिनींचे रेकॉर्ड अपडेट होणार 
-सरकारी जागेवरील अतिक्रमण कळणार 
-पायाभूत सुविधांसाठी सरकारी जागा उपलब्ध होणा 

loading image
go to top