अंबाडखिंड घाटात पुन्हा दरड कोसळली

अंबाडखिंड घाट (ता. भोर) - भोर- मांढरदेवी- वाई मार्गावर पडलेली दरड हटविताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी.
अंबाडखिंड घाट (ता. भोर) - भोर- मांढरदेवी- वाई मार्गावर पडलेली दरड हटविताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी.

भोर - भोर - मांढरदेव - वाई मार्गावरील अंबाडखिंड घाटात रविवारी (ता.११) दुपारी पुन्हा दरड कोसळली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र प्रवाशांना काही तास ताटकळत बसावे लागले. तीन तास रस्ता बंद होता. सायंकाळी पाचच्या सुमारास वाहतूक सुरळीत झाली. 

मागील आठवड्यात मंगळवारी (ता. ६) एका दिवसात तीन ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या. रविवारी पुन्हा दरड कोसळल्याने प्रवाशांनी चिंता व्यक्त केली आहे. रविवारी दुपारी एकच्या सुमारास अंबाडखिंड घाटमाथ्यावर वेरुळी गावला जाणाऱ्या फाट्याजवळ भोर बाजूच्या हद्दीत दरड पडली. त्यामुळे दोन्ही बाजूकडील प्रवाशी अडकून पडले. काही प्रवाशांनी पुन्हा परत जाणे पसंद केले.

तर दूरहून आलेल्या पर्यटकांची वाहने तेथेच थांबली होती. दरड पडल्याची माहिती मिळाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता योगेश मेटेकर हे त्वरित जेसीबीसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तीन तासांनंतर रस्ता वाहतुकीसाठी खुला करून दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com