बोरघाटात रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक खोळंबली

Landslide on railway track
Landslide on railway track

बोरघाट : मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर बोरघाटात ठाकूरवाडी-मंकी दरम्यान आज (गुरुवार) रात्रीच्या सुमारास रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याने पुण्याकडे येणारी वाहतूक खोळंबली आहे.

रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळा परिसरात सध्या पाऊस सुरू आहे. आज रात्री आठ वाजण्याच्या सुमारास रेल्वेच्या डाऊन आणि मिडल लाईनवर सुट्या झालेल्या दरडी कोसळल्या. सुदैवाने कोणतीही हानी झाली नसली तरी मुंबई-पुणे दरम्यानची रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.

पुणे -कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेस बोरघाटात अडकून पडल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. रेल्वेचे पथक अद्याप घटनास्थळी दाखल होत असून रात्री उशिरा दरड काढण्याचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com